शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टोळ्यांचे नव्हे, लोकांचे ऐकणार

By admin | Updated: July 19, 2014 23:22 IST

पतंगराव कदम : कॉँग्रेसच्या बैठकीत स्पष्टीकरण

सांगली : कॉँग्रेस पक्षात सर्वच ठिकाणी काही टोळ््या कार्यरत आहेत. या टोळ््यांकडून कुरघोड्या चालू असतात. आता कॉँग्रेस पक्ष उमेदवारी ठरविताना या टोळ््यांचे ऐकणार नाही. लोकांची मते आजमावूनच उमेदवार निश्चित केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पक्षाच्या पूर्वनियोजन बैठकीत दिली. मार्केट यार्डातील सभागृहात विधानसभा निवडणुकीची पूर्वनियोजन बैठक आज पार पडली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक रमाकांत खलप यावेळी उपस्थित होते. पतंगराव कदम म्हणाले की, गोव्यात खलप यांच्यावर पक्षांतर्गत टोळीकडून बराच अन्याय झाला. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. अशा टोळ््यांचा उपद्रव सगळीकडेच आहे; मात्र पक्षाने आता या टोळ््यांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे. लोकांशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवार ठरविण्याची भानगडही आता राहणार नाही. प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांना चाचपणी करावी लागेल. सांगली जिल्ह्यात सध्या मी व सदाशिवराव पाटील दोघेच काँग्रेसचे आमदार आहोत. अन्य तालुक्यांमध्ये सक्षम व लोकांच्या पसंतीच्या उमेदवाराची पाहणी सुरू आहे. मिरज तालुक्यात थोडी अडचण आहे. तरीही आम्ही गावोगाव फिरणार आहोत. कार्यकर्त्यांनीही घरोघरी फिरण्यास सुरुवात करावी. लोकसभेवेळी नवरा आमच्यासोबत आणि बायका-मुले भाजपकडे होती, आता तसे चालणार नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून कॉँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करावी. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रचाराची एक फेरी पूर्ण करावी. तालुका कॉँग्रेस कमिट्या आता सक्रिय व्हायला हव्यात. रमाकांत खलप म्हणाले की, लोकसभेत गटबाजीमुळे आपली वाताहत झाली. विधानसभेला ती होऊ द्यायची नाही. पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकसंध काम करायला हवे. उमेदवार निश्चित करतानाही प्रत्येक मतदारसंघातून एकच नाव सर्वानुमते निश्चित झाले, तर चांगली ताकद त्यामागे लावता येईल. शहराध्यक्ष मुन्ना कुरणे म्हणाले की, पंख्याखाली बसून उमेदवार निश्चित केले जाऊ नयेत. अन्यथा लोकसभेसारखी परिस्थिती उद्भवू शकते. (प्रतिनिधी)गणित बिघडले, तर सत्यजितला संधीआघाडीचे गणित बिघडले, तर सत्यजित देशमुख यांना संधी मिळेल आणि आघाडीचे जमले तर मग त्यांचे अवघड आहे, अशा शब्दात पतंगरावांनी शिराळ््यातील उमेदवारीबाबत मत स्पष्ट केले.कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, कॉँग्रेसला कधीही राष्ट्रवादीची साथ मिळाली नाही. आघाडी ही कॉँग्रेसच्या फायद्याची नाही. आघाडी करू नये म्हणून निरीक्षकांनी पक्षश्रेष्ठींना सांगावे. दिगंबर जाधव यांच्या नागरी प्रश्नांच्या रथाचा उल्लेख करताना पतंगराव म्हणाले की, दिगंबरने एक रथ केला आहे म्हणे. मी तो पाहिलाच नाही. पतंगरावांनी केलेला हा इशारा होता की टोमणा, असा प्रश्न मदन पाटील समर्थकांना पडला होता. कॉँग्रेसमध्ये अचानक उमेदवारी देण्याच्या प्रकाराबाबत पतंगरावांनी धत्तुरेंचे उदाहरण दिले. निरीक्षकांकडे पहात ते म्हणाले की, समोर बसलेले दाढीवाले आहेत ना, तेच धत्तुरे. त्यांना पक्षाने अचानक उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. ऐनवेळी तिकीट मिळाले तरीही आम्ही जोमाने प्रचार केला. दोनवेळा त्यांनी आमदारकी भूषविली.