शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत शिपाई ते शाखाधिकारी पदापर्यंत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST

लक्ष्मण सरगर/ लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : स्वत:चे शिक्षण मुलांच्या साथीने पूर्ण करत जिल्हा बँकेच्या शिपाई पदापासून शाखाधिकारी पदापर्यंतचा ...

लक्ष्मण सरगर/ लोकमत न्यूज नेटवर्क

करगणी : स्वत:चे शिक्षण मुलांच्या साथीने पूर्ण करत जिल्हा बँकेच्या शिपाई पदापासून शाखाधिकारी पदापर्यंतचा आनंदा हिंडे यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले.

आनंद हिंडे मूळचे नाशिक जिल्ह्यातील. नोकरीनिमित्ताने सांगली जिल्हा बँकेत १९८८मध्ये शिराळा येथे ते शिपाई म्हणून रुजू झाले. जेमतेम दहावी उत्तीर्ण असणारे हिंडे सचोटी व मेहनतीने नोकरी करत मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळावे, यासाठी झटले. स्वत:च्या अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची टोचणी त्यांना कायम होती. अशातच मुलांच्यासोबत त्यांनी शिक्षणाची पुन्हा नव्याने सुरुवात केली. मुलांच्या साथीने बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत लिपिक ते रोखपाल ते शाखाधिकारी पदापर्यंतचा प्रवास जिद्दीने व चिकाटीने पूर्ण केला.

एका मुलाला डॉक्टर बनवले, तर दुसरा मुलगा सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. शिक्षण घेण्याला वय रोखू शकत नसल्याचे उदाहरण हिंडे यांनी घालून दिले आहे. मुलासोबत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कला शाखेतून पूर्ण केले आणि ज्या बँकेत शिपाई म्हणून काम केले, त्याच बँकेत शाखाधिकारीपदी रुजू झाले. ते नुकतेच घाणंद शाखेतून सेवानिवृत्त झाले. आनंदा हिंडे याचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.