शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिमीटरच्या तपासणीत पेनही झाले सजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:28 IST

सांगली : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी खरेदी केलेल्या ऑक्सिमीटरच्या दर्जाबाबत मंगळवारी स्थायी समितीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. ...

सांगली : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी खरेदी केलेल्या ऑक्सिमीटरच्या दर्जाबाबत मंगळवारी स्थायी समितीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. या ऑक्सिमीटरने पेनाची प्राणवायू पातळी तपासल्याचे नगरसेवक प्रकाश मुळके यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिले. या प्रकाराने स्थायी सदस्य अवाक्‌ झाले. अधिकाऱ्यांना मात्र त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत नगरसेवक प्रकाश मुळके यांनी महापालिका प्रशासनाने खरेदी केलेले ऑक्सिमीटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला. हा आरोप सिद्ध करताना मुळके यांनी एका ऑक्सिमीटरद्वारे पेनाची ऑक्सिजन पातळी तपासली. यावेळी ऑक्सिजनची पातळी ९३ तर हृदयाचे ठोके ८० च्या दरम्यान दाखविले. हा सारा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यासह स्थायी समितीसमोर घडला. यावर मुळके यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

ऑक्सिमीटरवर चुकीच्या पद्धतीने ऑक्सिजन दाखविले जात आहे. निर्जिव वस्तूही सजीव होत आहेत. निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ येईल. त्यामुळे आतापर्यंत खरेदी केलेल्या सर्वच साहित्यांच्या दर्जाबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली. सदस्यांनीही अधिकाऱ्यांना याचा खुलासा करण्याची सूचना केली; पण अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर गुरुवारी पुन्हा स्थायी सभेत त्यावर चर्चा होणार आहे.