बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुरेश पाटील यांना एमएच-१० सीएल-५२७ या दुचाकीने धडक दिली. अपघातात रस्त्यावर फरपटत गेल्याने त्यांच्या पायाचे हाड मोडले. डोक्याला व हाता-पायास दुखापत होऊन ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वार सागर धनवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------
मिरजेत दोन दुचाकींची चोरी
मिरज : मिरजेत सांगली रस्त्यावरून दोन दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्या. याबाबत महेश सदाशिव सूर्यवंशी व अतुल वसंतराव देवांगस्वामी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी यांची एका रुग्णालयाच्या आवारातून १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीस गेली. वंटमुरे कॉर्नर येथून देवांगस्वामी यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास झाली. घटनेची गांधी चौक पोलिसांत नोंद आहे.
-------------------------
मिरजेत मटका घेणाऱ्यास अटक
मिरज : मिरजेतील पुजारी चौकात पानटपरीवर छापा टाकून मटका घेणाऱ्या शकील खलील निकडे (वय ४९, रा. गुरुवार पेठ, मिरज) याला गांधी चौक पोलिसांनी अटक केली. निकडे याच्याकडून रोख एक हजार २५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. गांधी चौक पोलिसांत घटनेची नोंद आहे.