इस्लामपूर : केंद्र सरकारने कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी, घरगुती व शेतीपंपाची वाढीव वीजबिले तातडीने कमी करावीत, ऊस उत्पादकांना १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले.
प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी तहसीलदार सबनीस यांना निवेदन दिले. यावेळी प्रा. एल. डी. पाटील, बी. जी. पाटील, कॉ. धनाजी गुरव, प्रा. एकनाथ पाटील, व्ही. जी. तिबिले, प्रा. विश्रांत रासकर, जयकर पवार, सागर रणदिवे, डी. एन. जावीर उपस्थित होते.
फोटो- ०९०२२०२१-आयएसएलएम-शेकाप न्यूज
इस्लामपूर येथे शेकापच्या वतीने विश्वास सायनाकर यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले. यावेळी बी. जी. पाटील, जयकर पाटील, प्रा. एल. डी. पाटील, प्रा. एकनाथ पाटील, व्ही. जी. तिबिले उपस्थित होते.