शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेत्यांची पक्षाच्या टेकूने अस्तित्वासाठी लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा-शिराळा मतदारसंघात शेतकरी संघटनेचे दिग्गज नेते आता विविध पक्षांचे टेकू घेऊन लढत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा-शिराळा मतदारसंघात शेतकरी संघटनेचे दिग्गज नेते आता विविध पक्षांचे टेकू घेऊन लढत आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली आहे, तर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी भाजपशी घरोबा करून त्यांच्याच ताकदीवर किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ केला आहे. या दोन्ही शेतकरी नेत्यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे. परंतु या लढाईत त्यांच्या स्वत:च्या कार्यकर्त्यांची वानवा आहे.

मागील युती शासनाच्या काळात पुणतांबा (जि. अहमदनगर) येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा श्रेयवाद पेटला होता. त्यातून तत्कालीन मंत्री सदाभाऊ खोत आणि तत्कालीन खासदार राजू शेट्टी हे नेते बॅकफूटवर गेले होते. यातूनच सावरण्यासाठी शेट्टी यांनी राज्यात आत्मक्लेष यात्रा काढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी करून अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आलेली उभारी पाहून रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातून आता किसान आत्मनिर्भर यात्रेची सुरुवात केली. या यात्रेत भारतीय जनता किसान मोर्चा आणि भाजपच्या नेत्यांचे सहकार्य घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनाच लक्ष्य केले, बॅकफूटवर पडलेली रयत क्रांती संघटना आक्रमक झाल्याचे दाखवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शह देण्याचा डाव यामागे आहे. हे दोन्ही नेते आता विविध पक्षांचा टेकू घेऊनच अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चाैकट

उभारीचा प्रयत्न

केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात सध्या दिल्लीत आंदोलन सुरू आहे. आंदोलनामागे राष्ट्रवादीचे नेते असल्याचे बोलले जात आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेट्टी यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांचा ताफा नेला होता. तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. यातून राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा उभारी आल्याचे दिसले.

फोटो - राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचा फोटा घ्यावा.