शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तीन हप्त्यामध्ये वीज बिले भरून घ्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

कुपवाड : कोरोना महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे फार मोठे नुकसान झालेले असून अनेक उद्योग बंद पडले ...

कुपवाड : कोरोना महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे फार मोठे नुकसान झालेले असून अनेक उद्योग बंद पडले आहेत. उद्योजकांनी पाठविलेल्या मालांचे सर्व पेमेंट पूर्णपणे ठप्प झालेले असून उद्योजकांना वीज बिलाची रक्कम एकरकमी भरणे अशक्य झाले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी उद्योजकांना तीन हप्त्यांमध्ये वीज बिले भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.

‘महावितरण’ला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे लॉकडाऊनमुळे फार मोठे नुकसान झालेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेता कोरोना अजून संपलेला नाही. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कामगार स्थलांतरीत झाल्यामुळे त्याचा उत्पादनावर व उद्योगांवर मोठा परिणाम झालेला आहे. पहिल्या लॉकडाऊनमधून सावरत असतानाच दुसरा लॉकडाऊन लागला. दुसऱ्या लॉकडाऊनमुळे उद्योग पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत.

अशातच उद्योजकांनी पाठविलेल्या मालांचे सर्व पेमेंट पूर्णपणे ठप्प झालेले आहेत त्यामुळे उद्योजकांना वीज बिलाची रक्कम एकरकमी भरणे अशक्य झाले आहे.

उद्योजक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे ‘महावितरण’ने उद्योजकांना वीज बिले ३ हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंत्यांकडे करण्यात आली आहे.

यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, व्हा. चेअरमन जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडु एरंडोले, संचालक रमेश आरवाडे, दीपक मर्दा, हरिभाऊ गुरव, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, नितीश शहा उपस्थित होते.