शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पवार पंतप्रधान तर जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुण कांबळे, ...

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुण कांबळे, खंडेराव जाधव, संजय कोरे, छाया पाटील, रोझा किणीकर, संग्राम पाटील, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करत नेत्यांना पाठबळ देण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार देशाचे पंतप्रधान तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व केक कापून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, पक्ष प्रतोद संजय कोरे, नगरसेवक खंडेराव जाधव, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया पाटील, शहराध्यक्ष रोझा किणीकर उपस्थित होत्या.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून राज्याला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांना आपण सर्वांनी एकसंघपणे पाठबळ द्यावे लागेल. नगरपालिकेसह सर्व निवडणुका प्रचंड ताकदीने लढण्याची, जिंकण्याची व्यूहरचना करावी लागेल. भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करू.

राज्य सरचिटणीस अरुण कांबळे म्हणाले, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करणे, हे मोठ्या भाग्याचे आहे. संजय कोरे, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, छाया पाटील, रोझा किणीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खासदार शरद पवार हे देशाचे पंतप्रधान तर जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुभाष सूर्यवंशी, आनंदराव पाटील, अ‍ॅड. विश्वासराव पाटील, एम. जे. पाटील, संजय पाटील, प्रा. कृष्णा मंडले, रफिक पठाण, सचिन कोळी, स्वरूप मोरे, प्रकाश कांबळे, शैलजा जाधव, वैशाली पाटील, प्रियांका साळुंखे, सागर चव्हाण, विशाल सूर्यवंशी, मोहन भिंगार्डे, विनायक यादव, विनायक कदम, शुभम पाटील उपस्थित होते. गोपाळ नागे यांनी आभार मानले.