शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

गावकुसाबाहेरील मुलांसाठी गावकऱ्यांचा पदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:17 IST

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सुया घे, पोत घे म्हणत भटकणाºया मरिआईवाले समाजातील पिढ्यान् पिढ्या शिक्षणापासून दूर परंपरेच्या अंध:कारात भटकत आहेत. अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी त्यांच्या स्वप्नांना परिस्थितीने तडे जात असल्याचेही वास्तव पाहायला मिळते. बेळंकीतील ग्रामस्थांच्या हृदयाला या मुलांच्या स्वप्नांनी ‘इरादा’ या सामाजिक संस्थेच्या ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सुया घे, पोत घे म्हणत भटकणाºया मरिआईवाले समाजातील पिढ्यान् पिढ्या शिक्षणापासून दूर परंपरेच्या अंध:कारात भटकत आहेत. अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी त्यांच्या स्वप्नांना परिस्थितीने तडे जात असल्याचेही वास्तव पाहायला मिळते. बेळंकीतील ग्रामस्थांच्या हृदयाला या मुलांच्या स्वप्नांनी ‘इरादा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साद घातली आणि गावकुसाबाहेरील या मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी त्यांना पदरात घेतले.दररोज सुया, बिब्बे, पिना, कंगवे, टिकल्या विकून कुटुंबाची होणारी गुजराण...आजच्या आधुनिक जमान्यात सुया, बिब्बे या वस्तूंनाही कमी झालेली मागणी...ज्याचा संपूर्ण गावाला आदर त्या मरिआईचा गाडाही आता विसावलेलाच...त्यामुळे हाताचा आणि पोटाचा मेळ घालताना होणारी घुसमट गावकुसाबाहेरचा मरिआईवाले समाज भोगत असतो.बेळंकीमध्ये मरिआईवाले समाजातील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. या समाजातील छाया भगवान मरिआईवाले या मुलीचे सातवीपर्यंतचे शिक्षण बेळंकीतील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले. आता पुढेच खरा संघर्ष छायाला अनुभवास येणार होता. तिला हायस्कूलला जाण्याची इच्छा होती. दररोज सुया, बिब्बे, टिकल्या विकून तिची आई कुटुंब चालवित आहे. शाळा नसताना छायासुध्दा आईबरोबर जात असे.हातावरचे पोट असणाºया उपेक्षित समाजातील छायाला शिक्षणासाठी वह्या, शैक्षणिक साहित्य, गणवेशाचीही भ्रांत होती. त्यामुळे तिला शिक्षण बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. ही बाब जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर यांनी इरादा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांना सांगितली. यावर ‘इरादा’चे स्वप्नील कोरे, सुभाष जाधव, डॉ. शरद गायकवाड, अनिरुध्द गवाणे, अक्षय कांबळे, वैभव रणदिवे या तरुणांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांनी त्या समाजातील मुलांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटप केले.बेळंकीचे सरपंच राजाराम गायकवाड, माजी सरपंच पांडुरंग कोरे, श्रीराम उद्योग समूहाचे राजू गवाणे, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य नेताजी गडदरे, सुरेश कौलापुरे, केंद्रप्रमुख सुभाष पवार, मुख्याध्यापक पुष्पा मुळे, बेळंकी शाळेचे उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर, नवनाथ नरळे आदींच्या उपस्थितीत छायाला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या समाजातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा निरंतर पोहोचविण्याचा इरादा बेळंकीकरांच्या दानशूरपणाचे उदाहरणच ठरले आहे.‘त्या’ मुलांना शिक्षित करणारपरिस्थिती आणि आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहणाºया मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ‘इरादा’चा एक प्रयत्न सुरू आहे. त्याची सुरुवात छायाच्या शाळाप्रवेशापासून झाली. गावातील मरिआईवाले समाजातील १२ मुले शिक्षण घेत आहेत. इयत्ता ७ वी पर्यंतच्या प्राथमिक शिक्षणानंतर इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ‘इरादा’ने घेतली आहे.‘छाया’ ठरणार आदर्शबेळंकीतील मरिआईवाले या समाजाच्या संपूर्ण पिढीतील ‘छाया’ ही पहिली मुलगी इयत्ता सातवीपुढील शिक्षण घेत आहे. तिच्यानंतर विविध इयत्तेत आठ ते दहा मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्या सर्वांपुढे ‘छाया’ आदर्श ठरणार आहे.