शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव-जयंतराव यांच्यात ‘सोनहिरा’वर गुफ्तगू

By admin | Updated: May 3, 2016 00:43 IST

सलोखा कायम : कारखानदारी व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची शक्यता

कडेगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम या दोन्ही दिग्गज नेत्यांत सोनहिरा साखर कारखाना येथे अध्यक्षांच्या दालनात गुप्त चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना राजकीय सल्ले दिल्याचे समजते. राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात नेत्यांमध्ये असलेला परंपरागत सलोखा आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले. वांगी येथील सोनहिरा कार्यालयात एका विवाह समारंभानिमित्त जयंतराव पाटील आले होते. या विवाहासाठी पतंगराव कदमही उपस्थित होते. विवाह समारंभ आटोपून दोन्ही नेते दुपारी ४ वाजता सोनहिर काखाना येथे आले. यावेळी अध्यक्ष मोहनराव कदम यांच्या दालनात दोन्ही नेत्यांनी एकांतात चर्चा केली. यावेळी पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी व बाबासाहेब सूर्यवंशी यांनी दोघांचेही स्वागत करून सत्कार केला. यावेळी चिफ केमिस्ट प्रकाश देशमुख, अर्जुन जगदाळे आदी उपस्थित होते.पाटील यांनी कदम यांच्याकडून सोनहिरा कारखान्याच्या गाळप क्षमता, आसवनी प्रकल्प, सहवीजनिर्मिती प्रकल्प याबाबत माहिती घेतली. पतंगरावांनी एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर दिला, १०० कोटीचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणानंतर माझा कारखाना राज्यात सर्वाधिक दर देणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसर असलेले तसेच नेतृत्वाच्या शर्यतीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही नेत्यांत आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. यावेळी पाटील भाजपशी सलोखा करून रस्ता चुकू नयेत म्हणून पतंगरावांनी काही टिप्स दिल्याचेही समजते. आगामी जिल्हा परिषद तसेच अन्य निवडणुकांबाबत दोघात चर्चा झाली असल्याची शक्यता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. परंतु याबाबतचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. (वार्ताहर)दोघांनी एकसंध व्हावे : कार्यकर्त्यांची इच्छाप्रारंभी जयंतराव व पतंगराव या दोन्ही नेत्यांचा सभागृहामध्ये सत्कार केला. यावेळी पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी यांनी, भीषण दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत आहे. पतंगराव कदम यांनी पाणी आणले, म्हणून आम्ही सुखी आहे. आता तुम्ही दोघांनी एकसंध होऊन पुन्हा महाराष्ट्र उभा करा, असे सांगितले. यावर जयंतराव पाटील यांनी एकविचाराने वाटचालीचे संकेत दिले.वांगी (ता. कडेगाव) येथे सोनहिरा कारखाना येथे अध्यक्षांच्या दालनात माजीमंत्री डॉ. पतंगराव कदम, आ. जयंत पाटील यांची गुप्त चर्चा झाली.