शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील गटबाजी प्रदेश काँग्रेसच्या दारी

By admin | Updated: June 23, 2016 01:18 IST

विशाल पाटील गटाविरोधात तक्रार : प्रदेशाध्यक्षांकडून दखल

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील दिवंगत मदनभाऊ पाटील गट व विशाल पाटील गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. प्रत्येक निवडीत विशाल पाटील गटाकडून बंडखोरी केली जात आहे. याबाबत बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. महापालिका व मिरज तालुक्यातील विशाल पाटील यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मदनभाऊ गटात अस्वस्थता आहे. त्याची चव्हाण यांनी दखल घेतली असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाहीही दिली आहे. महापालिका व तत्कालीन नगरपालिकेत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. अपवाद केवळ विकास महाआघाडीच्या पाच वर्षाचा कालावधीचा. महापालिकेसोबतच मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागातही मदन पाटील यांचाच गट कार्यरत आहे. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. अडीच वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुका मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवून काँग्रेसने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्याशिवाय मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळवून देण्यात मदनभाऊंचा वाटा होता. गेल्यावर्षी मदनभाऊंचे आकस्मिक निधन झाल्यानंतर वसंतदादा घराण्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आहे, तर चुलत बंधू विशाल पाटील यांनी महापालिका व मिरज तालुक्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातूनच महापालिकेतील काँग्रेसमध्ये उघड उघड गटबाजी सुरू झाली आहे. मदनभाऊंच्या पश्चात विशाल पाटील यांनी पालिकेत नगरसेवकांची मोट बांधली आहे. पालिकेतील विरोधक म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. नुकतेच मागासवर्गीय समिती सभापती निवडीत या गटाने बंडखोरी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष पाटील, माजी सभापती राजेश नाईक उपस्थित होते. महापालिकेतील गटबाजीबाबत चव्हाण यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे. मदनभाऊ गटाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार केली आहे. त्याशिवाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात आपणच उमेदवारीचे वाटप करणार असल्याचे विशाल पाटील गटाकडून सांगितले जात आहे. परिणामी मदनभाऊ गटात अस्वस्थता असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते. अशोक चव्हाण यांनी मदनभाऊ गटाला दिलासा देताना, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कुणाच्या सांगण्यावरून उमेदवारी दिली जाणार नाही. काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही दिल्याचे समजते. (प्रतिनिधी) अशोक चव्हाण : आॅगस्टमध्ये येणारकाँग्रेसमधील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हे आॅगस्ट महिन्यात सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी काँग्रेसचा मेळावाही आयोजित केला जाणार आहे. महापालिकेचे महापौर हारुण शिकलगार व काही नगरसेवकही लवकरच चव्हाण यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत. महापालिकेतील अडचणीसोबतच गटबाजीबाबत ठोस भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही या भेटीत केली करणार असल्याचे सांगितले.