खटाव (ता. मिरज) येथे मॉडेल स्कूलसंदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : मॉडेल स्कूलसाठी ग्रामस्थांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले. मॉडेल स्कूलसंदर्भात खटाव (ता. मिरज) येथे त्यांनी बैठक घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडख्यावेळी उपस्थित होते. शिक्षक व ग्रामस्थांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
शाळेतील उपक्रम, विद्यार्थी नोंदणी, शैक्षणिक प्रगती, शैक्षणिक उठाव आदींचे कौतुक केले. मॉडेल स्कूल उपक्रमात ग्रामस्थांचा सहभागही आवश्यक असल्याचे कोरे म्हणाल्या. डुडी म्हणाले की, मॉडेल स्कूल हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढीच्यादृष्टीने त्याची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. शिक्षक व ग्रामस्थांनी एकत्रित काम करून प्रकल्प यशस्वी करावा. जिल्हा परिषदही सर्वतोपरी सहकार्य करेल.
यावेळी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, सरिता कोरबू, मनोज मुंडगनूर, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर, बांधकाम उपअभियंता मसुटगे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय बांगर, विस्ताराधिकारी मगदूम, गणेश भांबुरे, सुभाष पवार, सरपंच सुजाता व्हनान्नावर, रावसाहेब बेडगे, बजरंग व्हनमोरे, महादेव घोरपडे, दशरथ टावकर, आदी उपस्थित होते. शिक्षक सुनील लांडगे व सहकाऱ्यांनी संयोजन केले.