शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

निराधार भावंडांचे विद्यार्थीच बनले पालक...- लिंगनूरच्या शाळेतील कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:23 IST

लिंगनूर : रक्ताच्या नात्यांचे बंध तुटतानाच नशिबी आलेल्या बेभरवशाच्या जीवनाला हृदयातून अंकुरलेल्या नव्या नात्याने हात दिला.

ठळक मुद्दे: हृदयाची नवी नाती गवसली; समाजासमोर माणुसकीचा नवा धडा हातभार लावताना अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पालकत्वाची जबाबदारीही स्वीकारली.पाठच्या बहिणीच्या चेहºयाकडे त्याने पाहिले आणि आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा निश्चय या कोवळ्या मनाने केला.

मोहन मगदूम ।लोकमत न्यूज नेटवर्कलिंगनूर : रक्ताच्या नात्यांचे बंध तुटतानाच नशिबी आलेल्या बेभरवशाच्या जीवनाला हृदयातून अंकुरलेल्या नव्या नात्याने हात दिला. मातृ-पितृ छत्र हरविल्यानंतर निराधार झालेल्या आठवीतील एका मुलाचे व त्याच्या बहिणीचे पालकत्व कोणी धनाढ्य व्यक्तीने नव्हे, तर त्यांच्याच शाळेतील बारावीच्या मुलांनी स्वीकारले. माणुसकीच्या वाटेवरची शाळेत जन्मलेली ही कहाणी नवा धडा बनून व्यावहारिक समाजासमोर आली आहे.लिंगनूर येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाºया इयत्ता बारावीच्या मुलांनी दिलेला माणुसकीचा धडा चर्चेचा विषय बनला आहे. याच शाळेत आठवी इयत्तेत शिकणाºया सूरज चंद्रकांत नाईक या मुलावर काही वर्षापूर्वी संकट कोसळले. आई-वडिलांचे छत्र हरविल्याने त्याच्यावर आभाळ कोसळले. यातून सावरणं कोणालाही कठीणच. पण पाठच्या बहिणीच्या चेहºयाकडे त्याने पाहिले आणि आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा निश्चय या कोवळ्या मनाने केला.

स्वयंपाकपाण्यापासून सगळ्या जबाबदाºया त्याने स्वत:वर घेतल्या आणि शिक्षणाचे दोरही बळकट केले. काट्याकुट्यांचा हा प्रवास तो मूकपणे चालत राहिला. पाच किलोमीटर अंतरावरील शाळा शिकताना सुरू असलेला या बहीण-भावाचा हा खडतर प्रवास त्यांच्याच शाळेतील बारावीच्या मुलांना दिसला. त्यांच्या हिमतीला केवळ दाद देऊन हे विद्यार्थी थांबले नाहीत. सामाजिक परिपक्वतेचे दर्शन घडविताना या विद्यार्थ्यांनी त्यांना हातभार लावताना अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पालकत्वाची जबाबदारीही स्वीकारली. स्वत:च्या खर्चासाठी आणलेल्या पैशातून वर्गणी काढून त्यांनी सूरज व त्याच्या बहिणीच्या शैक्षणिक वस्तूंची पूर्तता केली.

घरामध्ये आई, वडील असे मोठे कोणीच नसल्याने, घरातील सर्व कामे, तसेच लहान बहिणीसाठी व स्वत:साठीही जेवण तयार करण्याचे देखील काम सूरजलाच करावे लागते. हे सर्व करून परत शाळेला ५ कि.मी. चालत यावे लागते. त्यांची ही धडपड पाहून १२ वी मधील मुकुंद कुंभार, नितीन मगदूम, लक्ष्मण नाईक, प्रकाश पाटील, सदाशिव नाईक, बिरदेव गावडे, जोतिबा जाधव, विजय कांबळे या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन, मुकुंद कुंभार या विद्यार्थ्याच्या घरातील वापरात नसलेली सायकल दुरुस्त करून घेतली व सूरजला दिली. तसेच कपडे, वह्या, पेन, चप्पल आदी साहित्यदेखील त्यांनी घेऊन दिले. 

सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच शिक्षकांनी या निराधारांना आर्थिक अथवा वस्तुरूपी मदत करायला हवी. जे अपंग, अनाथ, निराधार, पीडित असतात, शिक्षणापासून वंचित असतात, जे प्रामाणिकपणे आपले कार्य करतात, अशा समाजातील मुलांना मदतीचा हात दिला पाहिजे. आपण केलेली मदत कुणा गरजूच्या आयुष्यातील आशेचा एक किरण बनू शकतो.- प्रा. सुनील खुट्टे(बारावीचे वर्गशिक्षक, लिंगनूर)