शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

पालकांनीच बंद केली कुरणे वस्ती शाळा!

By admin | Updated: September 9, 2014 23:47 IST

सिद्धेवाडीतील प्रकार : विरोध डावलून वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती

मिरज : सिध्देवाडी (ता. मिरज) येथील कुरणे वस्ती शाळेसाठी जि. प. प्रशासनाने पालकांचा विरोध डावलून वादग्रस्त निलंबित शिक्षकाचीच नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी काळ्या फिती लावून शाळा बेमुदत बंद ठेवली आहे. गेल्या शनिवारपासून बंद असलेल्या शाळेकडे गटशिक्षणाधिकारी फिरकले नसल्याने त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही पालकांनी केली आहे. दुसरा शिक्षक दिल्याशिवाय शाळा सुरू न करण्यावर पालक ठाम आहेत.कुरणे वस्ती प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकारी पोले यांनी पाचवीचा वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. चौथीपर्यंत दोन शिक्षक आहेत. पाचवीच्या वर्गासाठी गेल्या वर्षभरात नवीन शिक्षक देण्यास टाळाटाळ सुरू आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. जादा शिक्षक नेमणुकीची पालकांची मागणी होती. जि. प. प्रशासनाने सव्वा वर्षाने वादग्रस्त, निलंबित शिक्षक देऊन मागणीची चेष्टा केली असल्याचा पालकांचा आरोप आहे. पालकांनी या शिक्षकाला हजर करून घेण्यास विरोध दर्शवित यापूर्वी शाळेला कुलूप ठोकले होते. शिक्षण विभागाने दुसरा शिक्षक देण्याचे आश्वासन पाळले नाही. जि. प. प्रशासन व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या निषेधार्थ पालकांनी काळ्या फिती लावून शनिवारपासून शाळा बेमुदत बंद ठेवली आहे. मात्र शाळेकडे शिक्षण विभागाचा एकही अधिकारी न फिरकल्याने पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. दुसरा शिक्षक न दिल्यास शाळा सुरू न करण्याबरोबर पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महावीर खोत, सरपंच शीलाताई कुरणे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब माने, अनिता एडके, पांडुरंग व्हटकर यांनी दिला आहे. (वार्ताहर)दारू पिऊनच शिक्षक हजर ! कुरणे वस्तीवरील पालकांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून वादग्रस्त शिक्षकालाच शाळेत हजर राहण्यास पाठविण्यात आले होते. शाळेत हजर होण्यास आलेला शिक्षक दारू ढोसूनच होता. त्याला पाहताच पालक अधिकच संतप्त झाले होते. या शिक्षकाने पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून शाळेत न जाताच धूम ठोकली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महावीर खोत यांची भेट घेऊन आपण औषध म्हणून दररोज घेतो. , असे या शिक्षकाने सांगितले. अधिकारी अशा शिक्षकाला पाठीशी का घालत आहेत, असा सवाल पालकांतून विचारला जात आहे.