शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कवितेतून परतत्त्वाचा अलौकिक अनुभव

By admin | Updated: December 7, 2015 00:30 IST

इंद्रजित देशमुख : तडसर येथे सुनंदा शेळके यांचा ‘काव्यरत्न’ पुरस्काराने गौरव

कडेगाव : कविता ही परतत्त्वाचा अनुभव असणारी असते. असा अनुभव देणाऱ्या कवी पांडुरंग माळी गुरुजींचा काव्याचा वारसा पुढे सुरू राहावा, यासाठीच ‘काव्यरत्न’ पुरस्कार पुत्राने सुरू करून त्यांचे जिवंत स्मारक उभे केले आहे. ही बाब कौतुकास्पद व साहित्यिकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.तडसर (ता. कडेगाव) येथे मराठी साहित्य परिषद (कडेगाव-खानापूर) व कवी पांडुरंग माळी यांच्या कुटुंबियांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कवयित्री प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांना ‘कवी पांडुरंग माळी काव्यरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी इंद्रजित देशमुख म्हणाले की, माणूस आयुष्यात कसा जगला, हे महत्त्वाचे असते. माणूस जिगरबाज, कर्तबगार असला तरच पुढची पिढीही संस्कारसंपन्न बनते. आज समाजामध्ये मानसिकता बदललेली आहे. याला सर्वस्वी आजची बदललेली सामाजिक परिस्थितीच जबाबदार आहे. समाजामध्ये सामाजिक बदल घडविण्याचे काम साहित्यिकच करत असतात. साहित्यिकाचे जगणे अनुभवनिष्ठ असते. जी माणसे कर्तबगार व विनम्र असतात, अशीच माणसे साहित्यिक व कलावंत असतात. शब्दांशी खेळणारा कवी आपल्या काव्यातच आनंद शोधतो. अशापैकी एक कवी पांडुरंग माळी यांचे स्मारक पुरस्काररूपाने अनेक नवकवींना आत्मबळ देणारे ठरणार आहे.डॉ. सुनंदा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. सदानंद माळी यांनी स्वागत, तर प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मन्सूर जमादार यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, सुु. धों. मोहिते, अ‍ॅड. सतीश लोखंडे, त्रिलोकनाथ जोशी, रघुराज मेटकरी, दत्ता सपकाळ, शाहू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शांतिनाथ मांगले यांनी सूत्रसंचालन केले. आकाश पाटील (सरगर) यांनी आभार मानले. (वार्ताहर)