शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पैरा फेडाफेडीत विकास आघाडी अस्वस्थ

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : स्वाभिमानी संघटनेचा मात्र पांग फिटला

अशोक पाटील -- इस्लामपूर --लोकसभा, विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यात जयंत पाटील यांनाच विरोधकांनी लक्ष्य केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांच्यासह काही काँग्रेसचे नेते एकमेकांचा पैरा फेडून राजकीय मशागत करतात. त्यातूनच स्वाभिमानी संघटनेला सत्तेत स्थान मिळाले आहे. मात्र आ. नाईक यांचे मंत्रीपद हुकल्याने विकास आघाडी अस्वस्थ आहे.गेल्या दहा वर्षांत जयंत पाटील हेच विरोधक मानून आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, वैभव नायकवडी, जितेंद्र पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधात असलेले छोटे-मोठे गट आणि ऊस उत्पादक खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहिले आहेत. याचा फायदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला झाला आहे. सलग दोनवेळा लोकसभा निवडणुकीत शेट्टी विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी मोदी लाटेचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचा पैरा फेडण्यासाठी विधानसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदतीचा हात देतात. त्यानुसार आमदार शिवाजीराव नाईक यांच्या विकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात अग्रस्थानी राहून त्यांनी पैरा फेडला आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत गेली. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांनी भाजपात प्रवेश करुन निवडणूक लढवली. याचवेळी त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, अशी हवा होती. मात्र भाजपने घटकपक्षांना न्याय देण्याचे धोरण निश्चित केल्याने ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांना आमदारकीपाठोपाठ मंत्रीपदही देण्यात आले. त्यामुळे विकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत. नाईलाजास्तवच खोत यांचा सत्कार घेऊन, आपण एक आहोत, असे ते भासवत आहेत.एकेकाळी ‘स्वाभिमानी’ला मतदान केंद्रावर प्रतिनिधी मिळत नव्हता. आता एक खासदार आणि एक मंत्रीपद मिळाल्यानंतरही वाळवा-शिराळ्यात कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झालेली नाही. असे असले तरी वाळवा-शिराळ्यात भाजपपेक्षा ‘स्वाभिमानी’ची ताकद वाढली आहे.गेली दहा वर्षे राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडी काम करत आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही सर्व पक्षांना एकत्र घेऊन विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविणार आहे. घटकपक्षाला न्याय देण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळेच सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यात आम्हालाही आनंद आहे.- राहुल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य