शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पलूस तालुक्यात निवडणुकीसाठी रस्सीखेच

By admin | Updated: October 9, 2015 22:53 IST

११ ग्रामपंचायती : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमध्ये स्पर्धा

किरण सावंत -- किर्लोस्करवाडी--पलूस तालुक्यात होत असलेल्या चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून, पक्षामध्ये उमेदवार ओढण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. चौदापैकी ११ ग्रामपंचायतींवर माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम गटाची सत्ता आहे. मोराळे ग्रामपंचायतीमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आहे. अटीतटीच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आंधळी, नागराळे, दह्यारी या तीन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे नेते क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लाड व भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाची सत्ता आहे. कॉँग्रेसने ग्रामपंचायतीवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी चौदा ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आणण्यासाठी अग्रेसर भूमिका घेतली आहे. सध्या लाड यांनी गावोगावी जाऊन, कार्यकर्त्यांच्या बैठक सुरू केल्या आहेत. त्यांनी युवकांना एकत्र आणून मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. अरुण लाड व पृथ्वीराज देशमुख हेही गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीमध्ये शक्य तितक्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी-भाजप युतीचा झेंडा फडकविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. पुढीलवर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शरद लाड यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते. कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. लाड-देशमुख व कदम गटांना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तशी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. मतदार कोणाला कौल देणार, हे ३ नोव्हेंबर रोजी कळणार आहे.काँग्रेसची कसोटीचौदापैकी ११ ग्रामपंचायतींवर माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम गटाची सत्ता आहे. मोराळे ग्रामपंचायतीमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आहे. ११ ग्रामपंचायतींची सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होणार आहे. तसेच भाजप या निवडणुकीत किती जागा घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.