शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-मिरजेसह पाच ठिकाणी ऑक्सिजन टाक्या उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनामुळे प्राणवायूसाठी धावपळ सुरू असल्याच्या स्थितीत दिलासा देणारा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोनामुळे प्राणवायूसाठी धावपळ सुरू असल्याच्या स्थितीत दिलासा देणारा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सांगली, मिरजेसह पलूस, आटपाडी व कवठेमहांकाळ येथे ऑक्सिजन साठ्यासाठी टाक्या उभारल्या जाणार आहेत.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातच ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने कार्यवाहीला सुरुवात केली. सध्या मिरज शासकीय रुग्णालयात १२ हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. सांगलीतील सहा हजार लिटरची टाकी दहा दिवसांत वापरात येईल. त्यापाठोपाठ अन्य आटपाडी, कवठेमहांकाळ व पलूसमध्येही ग्रामीण रुग्णालयांच्या आवारात उभारल्या जातील. पुण्याहून येणारा द्रवरूप ऑक्सिजन तेथे साठविला जाईल. गरजेनुरूप पाईपद्वारे रुग्णांना मिळेल.

मिरजेतील सहा हजार लिटरची साठवणूक क्षमता गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दुप्पट करून १२ हजार लिटरवर नेण्यात आली, त्यामुळे तेथील रुग्णांना गरजेनुसार मुबलक प्राणवायू मिळतो. सांगली रुग्णालयात मात्र सिलिंडर वापरावी लागतात.

कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे. सध्या दररोज सरासरी ३५ ते ४० टन वापर होतो. सांगलीला दोन प्रमुख पुरवठादारांकडून ऑक्सिजन मिळतो, मात्र त्यांची क्षमता तीस हजार लिटरपर्यंतच आहे. त्यामुळे पुण्याहून येणारा ऑक्सिजन एका दिवसातच संपतो. ही तारांबळ टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुण्यातील दोघा उत्पादकांशी करार केले. त्याचा चांगला फायदा होत असून, पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. ऑक्सिजन उपलब्धतेबाबत जिल्ह्यात कोठेही तूर्त अनागोंदी किंवा आणीबाणीची स्थिती नाही.

मिरजेतील एका खासगी कोविड रुग्णालयाने ऑक्सिजनसाठी गतवर्षी स्वतंत्र प्रकल्प उभा केला, परंतु तो अत्यंत छोटा असून, कॉम्प्रेसरच्या धर्तीवर काम करतो. अन्य रुग्णालये मात्र बाहेरील पुरवठ्यावरच अवलंबून आहेत.

सांगली-मिरजेत चारशेहून अधिक रुग्णालये असतानाही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची गरज कधीही भासली नव्हती. मिरज शासकीय रुग्णालय स्वत:च्या साठवणूक क्षमतेमुळे स्वयंपूर्ण होते, तर सांगलीला पुरवठादाराकडून नियमित पुरवठा होत होता. अन्य खासगी रुग्णालये व सर्व उद्योगांसाठी सध्याचा वीस हजार लिटर क्षमतेचा खासगी प्रकल्प पुरेसा ठरत होता. कोरोनाच्या आणीबाणीत रुग्णालयांची मागणी कित्येक पटींनी वाढल्याने साठवणूक क्षमतेच्या फेरविचाराची वेळ आली आहे.

चौकट

पाच ठिकाणी साठवणूक, निर्मिती नव्हे

जिल्हा प्रशासन नव्याने पाच ठिकाणी साठवणूक केंद्रेे उभी करत आहे. तेथे उत्पादन मात्र होणार नाही. उत्पादन प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर तो रिकामा पडून राहणे परवडणारे नसेल.

चौकट

- जिल्ह्याची एकूण ऑक्सिजन साठवणूक क्षमता - ४० हजार लिटर

- शासकीय स्तरावर - १२ हजार लिटर

- खासगी स्तरावर - २८ हजार लिटर

- सध्याची दररोजची मागणी - ३५ ते ४० हजार लिटर