शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

अतिघाईमुळे गेले ८ हजारांवर बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अतिघाई मृत्यूला निमंत्रण देई...असे फलक पाहूनही त्याकडे कानाडोळा करीत सुसाट सुटलेल्या राज्यातील ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अतिघाई मृत्यूला निमंत्रण देई...असे फलक पाहूनही त्याकडे कानाडोळा करीत सुसाट सुटलेल्या राज्यातील तब्बल ८ हजार लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अशा अतिघाईने बळी गेलेल्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. यामध्येही हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांची संख्याही अधिक आहे.

राज्यातील अपघातात बळी गेलेल्यांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. बेशिस्तपणा व बेफिकीरी ही दोन ठळक कारणे यामागे आहेत. वाहतुकीचे नियम तोडल्याने २०१९ मध्ये १२ हजार ७८८ लोकांचे बळी गेले. त्यात जवळपास ४१ टक्के बळी हेे अतिवेगात वाहन चालविल्यामुळे गेले आहेत. दारू पिऊन वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे यासह अन्य नियम मोडल्याने दरवर्षी हजारो जीव जात आहेत. अशा नियमांच्या उल्लंघनाच्या व त्यातून अपघाताच्या घटनाही दरवर्षी वाढत आहेत.

चौकट

नियम मोडल्याचे परिणाम (२०१९)

उल्लंघनाचा प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ८१७५ ११,९४७

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह ५३ १२८

चुकीच्या दिशेने वाहन चालविणे १५४ ३८८

मोबाईल वापर १३ ६७

सिग्नल तोडणे ४ ३५

अन्य कारणे ४३८९ ६५८७

चौकट

नियमभंगामुळे अपघाताचे तुलनात्मक आकडे

२०१८

प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ३९२९ ५६२३

अन्य नियमांचे उल्लंघन ४९७ ८५०

२०१९

प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ८१७५ ११९४७

अन्य नियमांचे उल्लंघन ४६१३ ७२०५

चौकट

दुचाकीस्वारांना धोका अधिक

राज्यातील वाहन प्रकारानुसार अपघातांच्या एकूण आकडेवारीचा विचार केल्यास, सर्वाधिक म्हणजेच ४० टक्के अपघातग्रस्त दुचाकीस्वार आहेत. दुचाकीचे एकूण १३ हजार ३३० अपघात झाले असून, त्यात ५८९४ दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे.

चौकट

निष्पाप पादचारी बळी

दुचाकी व अन्य वाहनांच्या चुकीमुळे निष्पाप २८४९ पादचाऱ्यांचे बळी गेल्याची, तर ३ हजार ७७४ पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याची नोंद २०१९ मध्ये झाली.