शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत हमालांचा उद्रेक

By admin | Updated: October 7, 2016 00:04 IST

कार्यालयातच ठिय्या : कर्मचाऱ्यावर फौजदारी दाखल करा

सांगली : माथाडी महामंडळाच्या येथील कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हमालांचा आर्थिकविषयक महत्त्वाचा डाटा नष्ट झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी हमालांनी कार्यालयात घुसून तेथेच ठिय्या मारला. हमालांच्या आर्थिक बाबींच्या फायलींचे नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होईपर्यंत तेथून बाहेर न पडण्याचा पवित्रा हमालांनी घेतल्याने कार्यालयात काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडी मंडळाचे सचिव प्रवीण जाधव यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हमालांनी आंदोलन स्थगित केले. गेल्या महिन्यात माथाडी महामंडळाच्या येथील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आक्षेपार्ह संकेतस्थळ उघडल्याने हमालांच्या पगाराचा, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, बोनस, अपघात नुकसान भरपाई, रजा कालावधीतील लाभ आदी आर्थिक बाबी असणारा डाटा नष्ट झाला असल्याचा आरोप हमाल पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कार्यालयातील संगणक बंद असल्याने हमालांच्या फंडाची प्रकरणे, कर्ज प्रकरणे, नवीन नोंदणीचे काम पूर्णपणे थांबले होते. याबाबत चौकशी केली असता, संगणक दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे कारण देण्यात येत असल्याने हमालांमध्ये संताप होता. अखेर गुरूवारी चारशेवर हमालांनी माथाडी मंडळाच्या कार्यालयात घुसून, होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार? असा सवाल उपस्थित केला. हमालांचा महत्त्वाचा डाटा नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईच्या मागणीवर हमाल ठाम होते. अखेर संबंधित कर्मचाऱ्यावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत शिस्तभंगाच्या कारवाईबरोबरच त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडी मंडळाचे सचिव प्रवीण जाधव यांनी दिल्यानंतर हमालांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर, गोविंद सावंत, आदगोंडा गौंडाजे यांच्यासह चारशेवर हमाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)पॉर्न फिल्मने डाटा गेल्याची तक्रारकार्यालयातील संगणकावर कर्मचाऱ्याने पॉर्न वेबसाईट उघडल्यानेच हमालांचा महत्त्वाचा डाटा नष्ट झाल्याचा आरोप हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी केला. या कर्मचाऱ्याकडून सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य होणे चुकीचे असून शासकीय मालमत्तेचा गैरवापर या कर्मचाऱ्याकडून झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही मगदूम यांनी केली.