शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

‘ओटीएस’ने मिळणार १०० कोटींची सवलत

By admin | Updated: November 5, 2015 23:54 IST

भूविकास बॅँक : कायमची बंद होणार योजना

सांगली : भूविकास बॅँकेच्या जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांना कर्जमुक्त होण्यासाठी लागू केलेल्या एकरकमी कर्जपरतफेड योजनेला आता केवळ पाच महिन्यांचा कालावधी उरला आहे. तब्बल १३६ कोटी २५ लाखांचा थकबाकीचा डोंगर असला तरी, योजनेचा लाभ घेतल्यास १०० कोटी ९६ लाखांची सवलत मिळू शकते. जिल्हा भूविकास बॅँकेकडे २६५२ थकबाकीदार सभासद असून, त्यांच्याकडून प्रचलित पद्धतीनुसार १३६ कोटी २५ लाख रुपये येणे आहेत. एकरकमी योजनेतून त्यांना केवळ ३५ कोटी २९ लाख रुपये भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने २००७ पासून वारंवार एकरकमी परतफेड योजना लागू केली. मुदतवाढही दिली. त्यास सभासदांचाही प्रतिसाद मिळाला. यावेळी दिलेली एकरकमीची शेवटची संधी आहे. मार्च २०१६ नंतर ही योजना कायमची बंद होणार आहे. त्यामुळे थकबाकीदार सभासदांवर कारवाई करण्यात येणार आहे. सध्याच्या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला असून, २४ जुलै २०१५ पासून सुरू झालेल्या योजनेअंतर्गत ४९ सभासदांनी ३७ लाख ५० हजार रुपये भरून त्यांनी त्यांच्या जमिनी बोजामुक्त केल्या आहेत. अन्य थकबाकीदारांनाही त्यांच्या जमिनीवरील बॅँकेचा बोजा उतरविण्याची संधी यानिमित्ताने आली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅँकेच्यावतीने करण्यात आले आहे.सांगली जिल्हा भूविकास बॅँकेचा सक्षम बॅँकेत समावेश असूनही अवसायनाच्या प्रक्रियेत आता ती भरडली जात आहे. राज्यातील सर्वच बॅँकांप्रमाणे या बॅँकेचेही आता ‘पॅक-अप’ होणार आहे. १९३५ मध्ये भू तारण बँक नावाने स्थापन केलेल्या या बँकेचे १९६० मध्ये भू-विकास बँक असे नामकरण करण्यात आले होते. नाबार्डकडून निधी घेऊन शेतकऱ्यांना कर्ज देणे व ते वसूल करून पुन्हा नाबार्डला देणे, हे मुख्य कार्य या बँकेचे होते. शेती व सिंचन कर्जामुळे ही बँक शेती विकासात महत्त्वाची संस्था ठरली होती. (प्रतिनिधी)अधोगती थांबली नाहीजिल्ह्यातील भूविकास बॅँक १९९५ नंतर अडचणीत येत गेली. युती शासनाच्या काळात या बँकेला शासनाने थकहमी नाकारली. त्यामुळे नाबार्डने बँकेला कर्ज पुरवठा बंद केला. बँकेला कर्ज पुरवठा बंद झाल्याने बँक बंद पडणार, अशी अफवा पसरली. त्यामुळे कर्जवसुलीही थांबली. ८ जून २००७ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आला. त्यानंतर बँक उर्जितावस्थेत आणण्यासाठी काहीही प्रयत्न झाले नाहीत.