शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दुधोंडीत विनापरवाना कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST

सांगली : दुधोंडी (ता. पलूस ) येथे रविवारी (दि. ६) युवा कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पण त्यासाठी ...

सांगली : दुधोंडी (ता. पलूस ) येथे रविवारी (दि. ६) युवा कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पण त्यासाठी राज्य कबड्डी असोसिएशनची परवानगी नाही. त्यामुळे कबड्डीपटूंनी सहभागी होऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर पाटील व जिल्हा सचिव नितीन शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान, स्पर्धेत सहभागासाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याचा हेतू असल्याचा दावा पाटील यांनी केला. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ घोडके यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, धुळ्याच्या एका अनधिकृत संस्थेकडून राज्यभरात कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी धुळे, अकोला, यवतमाळ, भंडारा, नागपूर, वर्धा, वरोरा, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, करमाळा, तसेच ठाण्यात आयोजनाचा प्रयत्न झाला. राज्य कबड्डी असोसिएशनची त्याला परवानगी नव्हती. त्यामुळे ठाण्यासह अनेक ठिकाणी या स्पर्धा उधळून लावण्यात आल्या. पोलिसांतही तक्रारी देण्यात आल्या.

दरम्यान, सांगलीतही कबड्डी असोसिएशनने पोलिसांत धाव घेतली आहे. सचिव शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दुधोंडी येथील लीगसाठी राज्य कबड्डी असोसिएशनची मान्यता नाही. कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाचे नियम धुडकावून आयोजन केले जात आहे. त्यामुळे स्पर्धांना प्रतिबंध करावा. दुधोंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज आखाड्यालाही माहिती दिली आहे. लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर कारवाईचा इशारा दिला आहे.

चौकट

खेळाडूंकडून पाचशेचा गल्ला

दिनकर पाटील म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी या लीगच्या आयोजनाचा प्रयत्न झाला. प्रत्येक खेळाडूकडून पाचशे रुपयांप्रमाणे गल्ला जमविण्याचाही प्रयत्न झाला. राज्य संघटनेची परवानगी नसल्याने ठिकठिकाणी स्पधार् उधळून लावण्यात आल्या. दुधोंडीतही होऊ देणार नाही.