शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘माणगंगा’ संस्था सव्वासहा कोटी भरणार

By admin | Updated: March 29, 2016 00:28 IST

जिल्हा बँक सामोपचार योजनेत सहभाग : १४ संस्थांची यादी तयार

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेअंतर्गत आटपाडीच्या माणगंगा ऊसतोडणी व वाहतूक संस्थेने ६ कोटी १५ लाख ५६ हजार रुपये भरण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सामोपचार योजनेतील मोठी वसुली यानिमित्ताने होणार आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर आटपाडीचे नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी चर्चा केली. यावेळी सामोपचार योजनेत माणगंगा ऊसतोडणी व वाहतूक संस्थेला लाभ मिळू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशमुखांनी ही रक्कम भरणार असल्याचे सांगितल्याने बँकेला दिलासा मिळाला आहे. या संस्थेचे एकूण ९ कोटी ६१ लाख ६८ हजार रुपये येणे आहेत. माणगंगा कारखान्याच्या भविष्यातील कर्जप्रकरणाचे भवितव्यही ऊसतोडणी व वाहतूक संस्थेच्या या कर्जवसुलीवर अवलंबून आहे. याबाबतची कल्पना प्रशासकांच्या कालावधितही देण्यात आली होती. त्यामुळे आता संस्थेची ही वसुली सामोपचारमधून होण्यची शक्यता आहे. योजनेअंतर्गत १४ संस्थांची यादी जिल्हा बँकेने तयार केली आहे. या संस्थांची एकूण येणेबाकी ४१ कोटी ६३ लाख ९७ हजार इतकी असून, सामोपचार योजनेतून यातील १६ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये वसूल होऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. बँकेची वसुली मोहीम गतीने सुरू असून, सामोपचार योजनेतूनही मोठी वसुली होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)सामोपचार योजनेस पात्र संस्थासंस्था थकित रक्कम महाराष्ट्र विद्युत औद्योगिक संस्था नेर्ले८ कोटी ८३ लाख ८0 हजारनेर्ला ग्राहक संस्था ४८ लाख ११ हजारसदगुरू नागरी पतसंस्था, नेर्ले १४ लाख ९१ हजारनेर्ला सोया फूडस्३ कोटी ३३ लाख १८ हजारएस. के. फूडस्, गोटखिंडी७७ लाख ६७ हजारप्रकाश अ‍ॅग्रो, सांगली१३ कोटी ५७ लाख ९३ हजारमाणगंगा ऊसतोडणी संस्था, आटपाडी९ कोटी ६१ लाख ६८ हजारराजहंस कुक्कुटपालन, साखराळे८७ लाख ४९ हजारमहाराष्ट्र कॅप्सुल, बोरगाव५५ लाख ३६ हजार जिजामाता गोणी उत्पादक, बुधगाव७ लाख ५७ हजारवसंतदादा शाबू प्रकल्प१ कोटी ७२ लाख सुयोग यंत्रमाग, कवठेमहांकाळ१ कोटी २ लाख ब्रम्हनाथ यंत्रमाग, खंडेराजुरी ५६ लाख ९३ हजार