शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांच्यामुळे विरोधकांचा 'करेक्ट' कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:35 IST

ओळ : विटा येथे सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी आ. सदाशिवराव पाटील व अ‍ॅड. बाबासाहेब ...

ओळ : विटा येथे सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी आ. सदाशिवराव पाटील व अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव पाटील, किरण तारळेकर, किसन जानकर, सचिन शिंदे, किरण तारळेकर उपस्थित होते.

विटा : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या करेक्ट कार्यक्रमामुळे खानापूर मतदारसंघातील पारे गावचे सुपुत्र दिग्विजय सूर्यवंशी हे सांगलीचे महापौर झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळे आगामी काळात विरोधकांचा 'करेक्ट' कार्यक्रम होणार असल्याचे प्रतिपादन विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्यानंतर त्यांचा शुक्रवारी विटा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. अ‍ॅड. सदाशिवराव पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, तालुका तालुकाध्यक्ष किसन जानकर, उपाध्यक्ष सचिन शिंदे, विनायक कचरे, किरण तारळेकर उपस्थित होते.

यावेळी कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी काम केल्यामुळेच सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांना संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत सत्तांतर घडल्याचे सांगितले.

सांगलीचे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी मार्च २०२० मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मी केले होते. कारण मला भविष्यातील खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून ते दिसत होते, पण आता काहीही झाले तरी सदाशिवराव पाटील हेच खानापूरचे आमदार होणार आहेत. यात कोणतीही शंका नाही.

किरण तारळेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक फिरोज तांबोळी, अरुण गायकवाड, दहावीर शितोळे, विश्वनाथ कांबळे, लता मेटकरी, रेखा पवार, गजानन निकम, अ‍ॅड. सचिन जाधव, प्रशांत कांबळे, गोरख लाटणे यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आभार मानले.