शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी हुरळून जाऊ नये : दमयंतीराजे

By admin | Updated: February 24, 2017 23:44 IST

विरोधकांनी हुरळून जाऊ नये : दमयंतीराजे

सातारा : ‘तालुक्यात गटातील आणि गणातील मिळून एकूण ३० जागांवर लढत होऊन, सातारा विकास आघाडी आणि पुरस्कृत उमेदवार एकूण १४ ठिकाणी निवडून आले आहेत. तर विरोधकांचे एकूण १६ उमेदवार निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ जनतेने थोड्या फार फरकाने समान कौल दिला आहे. १४ आणि १६ मध्ये संख्यात्मक फार मोठा फरक नाही, त्यामुळे विजयी उमेदवारांनी विकासासाठी संपूर्ण योगदान द्यावे’ असे प्रतिपादन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांनी केले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दमयंतीराजे भोसले यांनी म्हटले आहे की, ‘सातारा तालुक्यातील जनतेने उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी व मित्रपक्ष असे एकूण पाच गटांच्या आणि ९ गणांच्या उमेदवारांना विजयी केले. तर विरोधी उमेदवारांना एकूण पाच गटांत आणि ११ गणांमध्ये विजयी केले आहे. म्हणजेच एकूण ३० जागांपैकी ‘साविआ’ आणि मित्रपक्ष मिळून १४ जागांवर तर विरोधकांनी एकूण १६ जागांवर विजय मिळवला आहे. १४ आणि १६ यामधील आकड्यांमध्ये संख्यात्मक फार मोठा फरक आहे असे नाही, त्यामुळे जनतेने दिलेला कौल हा सातारा विकास आघाडीच्या विरोधात दिला आहे, असा अन्वयार्थ कुणी काढू नये. एक-दोन जागांवर आम्ही कमी पडलो; पण जनेतेने झिडकारले वगैरे असे काहीही नाही. त्यामुळे विरोधकांनीही फार हुरळून न जाता, जनतेने आता संधी दिली आहे तर सगळ्यात चांगले काम करून दाखवणे आवश्यक आहे.यापुढे दडपशाही, मारामाऱ्या, गोंधळ, सूड उगवणे, खोट्या केसेस या प्रकारांना पायबंद घातला जाणे विरोधकांकडून अपेक्षित आहे. घराण्याला हे प्रकार शोभादायक नाहीत. जनतेचा सर्वांगीण विकास याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून, विकासाची संकल्पना यापुढे राबविली गेली पाहिजे तरच लोकशाही बळकट आणि समृद्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. असेही दमयंतीराजे यांनी शेवटी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)