शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांमुळे देशात आंदोलनजीवींची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:49 IST

सांगली : देशात कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजून नुकसान करणार्‍या ‘आंदोलनजीवीं’ची संख्या वाढते आहे. एल्गार परिषदेपासून शेतकरी आंदोलनापर्यंत नियोजनबध्द ...

सांगली : देशात कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजून नुकसान करणार्‍या ‘आंदोलनजीवीं’ची संख्या वाढते आहे. एल्गार परिषदेपासून शेतकरी आंदोलनापर्यंत नियोजनबध्द आंदोलनाची नीती विरोधकांकडून राबवली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी सांगलीत केला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्यावतीने तावडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संजय परमणे उपस्थित होते.

तावडे म्हणाले, केंद्रात भक्कम सरकार असतानाही जाणीवपूर्वक विरोधकांनी आंदोलने सुरू केली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांची आंदोलने नियोजनबध्द सुरू आहेत. एल्गार परिषद, सीएएविरोधातील आंदोलन, शाहिनबाग आणि आताचे शेतकरी आंदोलन असो, कायदे समजून न घेता कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजून नुकसान करणाऱ्या आंदोलनजीवींची संख्या वाढते आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत आंदोलने केली. मोदींनी शेतकरी आंदोलनाला आंदोलनजीवी म्हटले, तर इतके का झोंबले?शेतकरी आंदोलन संपले असते, तर उद्या हे विरोधक एक लाख कामगारांना घेऊन आंदोलनासाठी बसले असते.

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, मोदींना श्रेय जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा तृणमूल सरकारच्या तिजोरीत पडून आहे. बंगालमध्ये भ्रष्ट सरकारविरोधात तीव्र भावना आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत ममतादीदींचा निश्‍चित पराभव होईल. यावेळी संजय धामणगावकर यांनी परिचय करून दिला. विशाल गायकवाड यांनी आभार मानले.

फोटो : १७ शीतल ०२ (सिंगल फोटो)

ओळी :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मकरंद देशपांडे, संजय परमणे, डॉ. राम लाडे उपस्थित होते.