शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात बिनविरोध प्रस्तावाचा विरोधकांना झटका

By admin | Updated: July 6, 2016 00:19 IST

नगरपालिका निवडणूक : प्रस्ताव म्हणजे पोकळ हवा असल्याची विक्रम पाटील यांची टीका

अशोक पाटील -- इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी आगामी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. मात्र विरोधकांतील काही नेत्यांना याचा जोर का झटका बसला आहे. पक्षप्रतोद पाटील यांचा प्रस्ताव पोकळ आहे, असा टोला भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना मारला.सत्ताधारी राष्ट्रवादीच्या ताकदीपुढे विरोधकांची ताकद तोकडी आहे. विरोधकांची मोट निवडणुकीच्या अगोदरच हेलकावे खात आहे. मागीलवेळी राष्ट्रवादीला विरोधकांनी एकत्र येऊन आव्हान दिले होते, परंतु विरोधी गटातील काही उमेदवारांनी स्वार्थ साधण्यासाठी अंतर्गत तडजोडी केल्यामुळे मातब्बरांचे पानिपत झाल्याची चर्चा होती. तेव्हापासून विरोधकांमधील अंतर्गत दरी अधिकच रुंदावत गेली आहे, ती अद्यापही कायम आहे. त्यामुळेच एकवाक्यता नसल्याचे जाणवते. त्याचा फायदा पक्षप्रतोद पाटील यांनी उठवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. मात्र हा प्रस्ताव विरोधी गटातील काही नगरसेवकांना चांगलाच झोंबला आहे. त्यामुळेच विक्रम पाटील यांनी, पक्षप्रतोदांचा हा प्रस्ताव म्हणजे पोकळ हवा असल्याचा टोला मारला आहे.इच्छुकांनी आपापल्या प्रभागातील सीमारेषांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. मतांची आकडेवारी आणि विरोधात कोण असेल, याचे तर्क-वितर्क लढवत आर्थिक गणिताचा विचार सुरू केला आहे. आर्थिक तडजोडीतून मतदान करणाऱ्यांचा सात-बारा काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरुन किती खर्च येणार, याचाही अंदाज बांधला जात आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी सत्ताधारी राष्ट्रवादीत आहे. याउलट विरोधकांची स्थिती आहे.