शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या निधीबद्दल विरोधकांकडून अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:18 IST

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा ...

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा काढून घेईल, अशी अफवा विरोधक पसरवित आहेत. शेतकºयांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केले.रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्याहस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री देशमुख म्हणाले, देशातील १२ कोटी शेतकºयांना योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेचा दोन हजार रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. अल्पभूधारक शेतकºयांना या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षाला ६ हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला योजना जाहीर केली व महिना होण्याअगोदरच २४ फेब्रुवारीला शेतकºयांच्या खात्यात पैसे पाठविण्यात आले, ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. शेती आणि शेतकरी या दोघांनाही समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द आहे.कृषी यांत्रिकीकरण मोहिमेंतर्गत शेतकºयांना सहा ट्रॅक्टर, एक रोटाव्हेटर व एका हळद कुकरचे पालकमंत्र्यांच्यहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित शेतकºयांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.शेतकरी कर्जमुक्त होणारपालकमंत्री देशमुख म्हणाले, शासनाच्या धोरणामुळे मंजूर झालेला रुपया न् रुपया शेतकºयांच्या हातात मिळत आहे. ही तर सुरूवात आहे. यापेक्षा अधिक सुविधा शेतकºयांसाठी पुरविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या सन्मान योजनेमुळे खासगी सावकारांकडे पैशासाठी जाण्याची गरज नसून बॅँकांमध्येही जावे लागणार नाही. शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचेच धोरण सरकारने अवलंबिले आहे. ते आता सत्यात उतरत आहे.