शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणीपट्टी वाढीला सदस्यांचा विरोध

By admin | Updated: March 15, 2017 23:50 IST

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : कर्जमाफीची मागणी; म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणावरून प्रशासन धारेवर

सांगली : जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक नळपाणी योजना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आलेला १७०० रुपये पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सदस्यांनी बुधवारी फेटाळला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. म्हैसाळ येथील स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल सदस्यांनी सभेत त्यांचा निषेध केला.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, कुसूम मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषदेच्या बारा प्रादेशिक नळपाणी योजना आहेत. योजनेतून वगळलेल्या गावांची थकबाकी ५ कोटीवर गेली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या थकबाकीमुळे योजना चालविणे मुश्किल होत आहे. पाणीपट्टी न वाढविल्यास शासनाकडून दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही. या कारणांनी प्रादेशिक योजनांची पाणीपट्टी वार्षिक १८०० रूपयांवरून ३५०० रूपये करण्याचा ठराव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भोसले यांनी मांडला. थकबाकी वसुलीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. कर्मचारी पगार, वेतन, भत्त्यांसाठी दोन कोटी रुपये लागतात. योजनेवरील वसुली ८० ते ८५ टक्के आहे, परंतु १० कोटी खर्च येत आहे. वसुली आणि खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याने पाणीपट्टी वाढ करण्याची त्यांनी सूचना केली. परंतु, सर्वच सदस्यांनी यास तीव्र विरोध करीत पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव फेटाळला. कल्पना सावंत यांनी, पाणीपट्टी वाढ ही मलमपट्टी असून कायमस्वरुपी उपाययोजना शोधाव्यात, अशा सूचना मांडल्या. छाया खरमाटे यांनी, पाणीपट्टी वाढ चुकीची असल्याचे सांगितले. काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी, प्रशासनाला योग्य वाटत असेल तर निर्णय घेऊ, त्याबाबतचा ठराव पुढील सभागृह कायम करेल, असे सांगितले. परंतु अध्यक्षा पाटील यांच्यासह सदस्यांनी विरोध दर्शविला. बसवराज पाटील, जयश्री पाटील यांनीही पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. समारोपाच्या सभेत योजना शिंदे, कल्पना सावंत यांना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. खानापूर पंचायत समितीचा यशवंत पंचायत अभियानात पुणे विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सभापती वैशाली माळी, सुहास बाबर, गटविकास अधिकारी संतोष जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)