शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कारभार मोकाट; कारभारी सैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:20 IST

तासगाव हल्ला प्रकरण घटनेचा गुलदस्ता : राजकीय रंग; सत्य उघडकीस आणण्याचे आव्हान

दत्ता पाटील ल्ल तासगाव ठेकेदारी करून स्वत:च्या पोतड्या भरायचा उद्योग तासगावातील काही कारभारी वर्षानुवर्षे करत आहेत. सत्ता कोणाचीही असली, तरी कारभार आमचाच, या अविर्भावात असणाऱ्या ठेकेदार कारभाऱ्यांकडून निविदा दाखल करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात आला. यानिमित्ताने ठेकेदार कारभारी लालसेपोटी सैराट झाल्याचे स्पष्ट झाले. मोकाट कारभाराला लगाम घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. हा हल्ला आणि पालिकेतील कारभाऱ्यांचे काही कनेक्शन असल्याचे अद्याप तरी उघडकीस आले नाही. मात्र तसा राजकीय रंग काही नेत्यांकडून दिला गेला असला तरी, नेमके सत्य अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते चव्हाट्यावर आणण्याचे आव्हान पोलिस प्रशासनावर असले तरी, ठेकेदार ‘कारभारी सैराट झालं जी. .’ असंच म्हणण्याची वेळ आली आहे.नातेवाईकांच्या, मर्जीतल्या ठेकेदारांच्या नावावर ठेके घ्यायचे. ठेका घेणे शक्य नसेल, तर टक्का घ्यायचा आणि विकासकामांचा दिंंढोरा पिटायचा उद्योग वर्षानुवर्षे पालिकेच्या कारभारात सुरु आहे. पालिकेतील ठेकेदारीच्या मोकाट कारभाऱ्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेला आवर घालण्याचा प्रयत्न झाला, तर कारभारी कसे सैराट होऊ शकतात, याचे प्रत्यंतर दोन दिवसांच्या घडामोडीतून पहायला मिळत आहे. सुमारे पावणेतीन कोटींच्या ३९ विकासकामांच्या निविदा २८ तारखेला प्रभारी नगराध्यक्षा सारिका कांबळे यांच्या सहीने जाहीर करण्यात आल्या होत्या. या निविदा दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे झाली होती. या मुदतवाढीला काही नगरसेवकांनी विरोध केल्याने ही प्रक्रिया बारगळली. त्यानंतर ठेकेदारीत इंटरेस्ट असणाऱ्या कारभाऱ्यांनी एकत्रित येऊन कोणत्या ठेकेदाराने कोणत्या कामाची निविदा दाखल करायची, याचे नियोजन एका बैठकीत केले. मात्र नियोजनाप्रमाणे काही नगरसेवकांच्या मर्जीतील निविदा वेळेत दाखल होऊ शकल्या नाहीत. ठेका मिळणार नसल्याच्या भावनेतून सैराट झालेल्या कारभाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर मुदतवाढीसाठी दबावतंत्राचा वापर केला.दबावतंत्राच्या घटनेदिवशीच रात्री मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध झाला. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला. या घटनेला राजकीय रंग मिळाला. सत्य काहीही असले तरी, पालिकेतील काही कारभारी ठेकदारीतून सैराट झाले आहेत, हे उघड सत्य आहे.गुलदस्ता उघडण्याचे आव्हान पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी कसब वापरुन प्रशासकीय यंत्रणेवर झालेल्या हल्ल्याचा बारा तासात छडा लावला. हल्लेखोर जेरबंद केले. मात्र हल्लेखोर सापडल्याने तपास संपला नाही, तर खरा तपास इथुनच सुरु झाला आहे. एखाद्या अधिकाऱ्यांच्या घरावर, कुटुंबिंयावर हल्ला होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेचा छडा लागला आहे. मात्र नेमके सत्य काय? याचा गुलदस्ता कायम आहे. चर्चा हल्लेखोरांच्या संबंधाची मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या चार हल्लेखोरांना पोलिसांनी मोठे कसब वापरुन ताब्यात घेतले. पोलिसांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र जेरबंद झालेले हल्लेखोर हे पालिकेतील काही कारभाऱ्यांशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे या हल्लेखोरांचे कोणाशी राजकीय कनेक्शन आहे? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. याउलट हल्ला केलेले नेमके हल्लेखोर कोण हेच आहेत का? याची कुजबुज पालिकेच्या आवारात सुरु आहे. तर हल्ला होण्याच्या काही काळ आधी मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ असणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्याने हल्लेखारांना ओळखता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर कोणी दबाव आणला का? याचीही चर्चा सुरु आहे.