शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटलांच्या तुरीचा तोराच न्यारा

By admin | Updated: February 10, 2017 00:05 IST

विक्रमी उत्पादन : सुसलादच्या तब्बल १४ फूट उंच तुरीच्या झाडांची चर्चा

गजानन पाटील ल्ल संखसर्वसाधारणपणे शेतकरी उसाचा खोडवा घेतात; मात्र तूर पिकाचा सलग चौथा खोडवा घेत एकरी वर्षभरात ४३ क्विंटल उत्पादन तेही ठिबक सिंचनावर घेण्याचा प्रयोग जत तालुक्यातील सुसलाद येथील गौडाप्पा पाटील या प्रगतशील शेतकऱ्याने केला आहे. त्यांच्या शेतातील १४ फूट उंचीचे तुरीचे पीक पाहिल्यानंतर पाटलांच्या तुरीचा न्याराच तोरा पाहायला मिळाला.लागवडीपूर्वी सरीमध्ये एकरी एक ट्रॅक्टर शेणखत घातले. त्यानंतर २५ किलो १०:२६:२६ खत सरीमध्ये मिसळले. शेणखत व रासायनिक खत सरीत पसरले. ३० दिवसांनी युरिया १० किलो व डीएपी २० किलो टाकले ६० दिवसांनी दुसरे खुरपणी करुन २० किलो युरिया व खत २० किलो सरीमध्ये टाकले. ९० दिवसांनी विद्राव्य खत व टॉनिक याची फवारणी केली. ११० दिवसांनी विद्राव्य खत व टॉनिक याची दुसऱ्यावेळी फवारणी केली. कळी सोडल्यापासून फूल व शेंगा पक्व होईपर्यंत १० दिवसांच्या अंतराने कीटकनाशकाची फवारणी केली. तुरीची सात फुटापर्यंत उंची वाढली. डिसेंबरमध्ये अडीच एकरात ३८ क्विंटल उत्पादन काढले. नंतर तुरीचे पीक न काढता छाटणी करुन घेतली.शेणखत, ड्रीपद्वारे खताच्या मात्रा दिल्या. त्यामुळे तयार खोडावर खोडवा तूर तीन महिन्यात तयार झाली. मार्चमध्ये पुन्हा २० क्विंटल उत्पादन निघाले. डिसेंबरमध्ये ३८ व मार्चमध्ये १० क्विंटल उत्पादन निघाले. वर्षात ५८ क्विंटल उत्पादन पहिल्यावर्षी मिळाले. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये छाटणी केली. मात्र दुष्काळ असल्याने उत्पादन न घेता पीक जिवंत ठेवण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे जूनमध्ये दुसऱ्या खोडव्याचे घेता आले नाही.जुलैमध्ये तिसरा खोडवा घेण्याची तयारी केली. शेणखत व ड्रीपद्वारे खताच्या मात्र दिल्या. कोणत्याही कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. एका झाडाला सरासरी दोन किलो तूर असल्याने ५० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. या झाडांची तिसऱ्या खोडव्याला उंची १४ फूट वाढली आहे. आतापर्यंत १५ क्विंटल तूर १०० रुपये दराने विकली आहे. वर्षात बियाणे विक्रीतून व तूर विक्रीतून हेक्टरी १० लाख ८० रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे.द्राक्ष पिकालाही तूर पर्यायी पीक ठरु शकते. मात्र त्यासाठी लागवड तंत्र वापरायला हवे. योग्यप्रकारे काळजी घेतल्यास तुरीचे पाच खोडवे देखील घेता येऊ शकतात. वर्षभरात दोनवेळा उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुधारित तंत्राचा वापर करुन तूर लागवड करावी. - गौडाप्पा पाटील, शेतकरी, सुसलाद