शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज कोविड रुग्णालयात केवळ दहा टक्के रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

मिरज : मिरज सिव्हिल कोविड रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यात ५ हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कमी ...

मिरज : मिरज सिव्हिल कोविड रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यात ५ हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने ३७५ खाटा असलेल्या कोविड रुग्णालयात सध्या केवळ ४० रुग्ण उपचार घेत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यावर आहे. कोविड रुग्णांची संख्या घटल्याने नवीन वर्षात नाॅन कोविड रुग्णांवर उपचार कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले. रुग्ण कमी झाले तरी कोविड रुग्णालय सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी मार्च महिन्यात मिरज सिव्हिलधील इतर रुग्णांना सांगलीत स्थलांतरित करुन मिरज सिव्हिलचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. येथे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ३७५ खाटा, ८० डाॅक्टर व २५० परिचारिका कार्यरत आहेत. येथे ३६० रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व ६ केएल ऑक्सिजन टॅंकची व्यवस्था आहे. गेल्या नऊ महिन्यात कोरोनासंशयित म्हणून ९ हजार ५०० रुग्ण दाखल झाले. त्यापैकी कोरोनाची लागण झालेल्या ५ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.

नऊ महिन्यात रुग्णालयाच्या कोविड प्रयोगशाळेत १ लाख २५ हजार जणांची कोविड तपासणी करण्यात आली. कोरोनामुळे रुग्णालयात सुमारे ६०० जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सुमारे ९० डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाला तोंड द्यावे लागले. नोव्हेंबरपर्यंत फु्ल्ल असलेल्या मिरज कोविड रुग्णालयात सध्या केवळ ४२ रुग्ण उपचार घेत आहेत. मिरज सिव्हिलमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या आव्हानाचा मुकाबला करताना रुग्णांचा मृत्यू दर आटोक्यात ठेवल्याचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.

आता डिसेंबरपासून रुग्णसंख्येत घट होत असून दररोज दोन ते चार पाॅझिटिव्ह रुग्ण येत आहेत व तितकेच रोज बरे होत आहेत. आता केवळ १० टक्के रुग्ण असल्याने कोविड रुग्णालय बंद न करता नवीन वर्षात येथे नाॅन कोविड विभाग सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.