शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लढा दिला तरच हक्क मिळेल

By admin | Updated: August 4, 2014 00:10 IST

रंजना निरुला : सिटू, आशा व गटप्रवर्तक यांचे पहिले राज्य अधिवेशन उत्साहात

कोल्हापूर : देशातील इतर राज्यांत ‘आशा’ वर्कर्सना राज्य सरकार मासिक मानधन देते. पण, महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार मासिक मानधन देण्यास उदासीनता दर्शवित आहे. त्यासाठी ‘आशां’नी लढा द्यावा, तरच तुम्हाला हक्क मिळेल, असे मत दिल्लीच्या आशा व गटप्रवर्तक राष्ट्रीय समन्वयक रंजना निरुला यांनी व्यक्त केले.सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू), आशा व गटप्रवर्तक यांच्या पहिल्या राज्य अधिवेशनात कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील एका हॉलमध्ये झालेल्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्य समन्वयक विजय गाभणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष मरियम ढवळे, ‘आशां’च्या समस्यांविषयक अभ्यासक कविता भाटिया (ठाणे) आदींची उपस्थिती होती. रंजना निरुला म्हणाल्या, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ‘आशां’ना योग्य मानधन दिले जात नाही. देशभरातील सर्व ‘आशां’ना मासिक किमान सात हजार रुपये मिळावेत, अशी मागणी आहे. आरोग्य खात्यात होणारी खर्चाची अपुरी तरतूद, अपुरे कर्मचारी व मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे आशांना काम करण्यात अडचणी येत आहेत. ‘आशां’ना जेवढे मानधन मिळेल तेवढाच प्रोत्साहन भत्ता मिळेल, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. सध्या महाराष्ट्रात सुमारे ६२ हजार तर जिल्ह्णात २८०० ‘आशा’ आहेत.मरियम ढवळे म्हणाल्या, दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्य सरकारने महिलाविषयक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.स्वागत डॉ. माया पंडित-नेरकर यांनी केले. प्रा. डॉ. सुभाष जाधव यांचे भाषण झाले. विजयाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुभाष निकम, चंद्रकांत यादव, प्राचार्य ए. बी. पाटील, शिवाजी मगदूम, आनंदराव चव्हाण उपस्थित होते. कविता अमिनगावी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)