शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

प्रति एकर केवळ ६० हजार रूपये भरपाई

By admin | Updated: January 19, 2015 00:32 IST

तिकुंडी येथील प्रकार : भू-संपादनास शेतकऱ्यांच्या विरोधामुळे साठवण तलावाचे काम रखडले

दरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील साठवण तलावासाठी ९३ शेतकऱ्यांची ७५ एकर ५९ गुंठे जमीन पाच वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली आहे. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीची प्रति एकर फक्त ६० हजार दराने भरपाई मंजूर झाली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई कमी आहे. केंद्राने भू-संपादनाच्या भरपाईसाठी नवीन तरतुदी केल्या आहेत. या केलेल्या तरतुदीनुसार बाजारमूल्याच्या चौपट भरपाई देण्याची आहे. यानुसार भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जमिनीची भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांकडून स्वीकारली गेली नसल्याने १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये दोन वर्षांपासून शासनदरबारी पडून आहेत. भरपाईच्या वादात ९३ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. याकडे भू-संपादन विभागाने लक्ष देऊन केंद्राच्या भू-संपादनप्रमाणे नुकसानभरपाई, पुनर्वसन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.स्थानिक स्तर विभाग जलसंधारण महामंडळ, औरंगाबादअंतर्गत तिकोंडी साठवण तलावास २०१० मध्ये प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. तलावाची मूळ रक्कम ५ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. जानेवारी २०११ ला टेंडर काढण्यात आले. टेंडर रक्कम ३ कोटी ५० लाख आहे. हिरवे कन्स्ट्रक्शन, पंढरपूर यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचा कालावधी २४ महिन्यांचा आहे. तलावाची साठवण क्षमता ४८ दक्षलक्ष घनफूट आहे. बुडीत क्षेत्र ३० हेक्टर आहे, तर सांडवा लांबी १४८ मीटर आहे. ओलिताखाली येणारे क्षेत्र २४९ हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काम गेली चार वर्षे रखडले आहे. सध्या तलावाचे काम २० टक्के झाले आहे.भू-संपादन विभागाने पाच वर्षांपूर्वी जमीन भू-संपादित केली आहे. भू-संपादन ८-अ ची नोटीस पाठविली आहे. त्यानुसार कब्जापट्टी ही करण्यात आली आहे. तलावात घरे, विहीर, कूपनलिका, डाळिंब बाग गेली आहे. बागायत व जिरायत जमीन गेली आहे. ९३ कुटुंबांची घरे गेल्याने ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीचा दर ठरविला असून, त्यानुसार १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये रक्कम मंजूर झाली आहे. (वार्ताहर)सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ही नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणे भरपाई मिळाली पाहिजे. नाही तर तलाव होऊ देणार नाही. तलावामध्ये आत्मदहन करण्याची तयारी आहे. -मल्लाप्पा बळूर, शेतकरी, तिकोंडीतलावाचे भू-संपादन झाले आहे. कब्जेपट्टी झाली आहे. शासननियमाप्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांनाही सहकार्य करावे. तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे.- अभिमन्यू तेली, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, जतबावीस एकराची भरपाई साडेतेरा लाख? तलावासाठी भू-संपादन विभागाने मल्लाप्पा बळूर, विठ्ठल महाजन, यल्लव्वा बळूर, शंकर रायगोंड, सखुबाई महाजन, मडीवाळाप्पा जेऊर यांच्यासह २० शेतकऱ्यांची २२ एकर जमीन १३ लाख ५३ हजार ७२० रुपये दराने संपादन केली आहे. म्हणजेच एकराला फक्त ६० हजार इतकीच भरपाई मंजूर झाली आहे.वीस वर्षांपासून शेतात राहणारे संजीव चन्नाप्पा बळूर या शेतकऱ्याचे पत्र्याचे घर ठेकेदाराने पाडून जमीन सपाट केली आहे. बळूर हे ऊसतोडीला बाहेरगावी गेले होते. गेल्या ४ वर्षांपासून घर नसल्याने कुटुंब घेऊन साबू बळूर यांच्या शेतामध्ये राहात आहेत. बेघर होण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.