सांगली : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी २२ व २३ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्यांसाठीच मेळावा होईल. इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी दि. २० सप्टेंबरपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
मेळाव्याअंतर्गत जिल्ह्यातील नामवंत उद्योजकांकडील फायनान्सिअल ॲडव्हायझर, डाटा एंट्री ऑपरेटर, सुपरवायझर, टेक्निशियन, सेल्स ऑफिसर, सेल्स को-ऑर्डिनेटर, सेल्स असोसिएट, एलआयसी ॲडव्हायझर, मेडिसिन फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, सीएमओ, नर्सेस, को-ऑडिनेटर, ट्रेनी क्लार्क, इत्यादी पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच आयटीआय, डिप्लोमा, एसएससी, एचएसची, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांसाठी विविध रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.