आरगमध्ये महिलांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात स्वयंसहाय्यता गटातील महिलांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला. आरग, बेडग परिसरातील महिला या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाल्या.
मोदी यांनी ‘आत्मनिर्भर नारी शक्ती से संवाद’ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण स्वयंसहाय्यता गटातील महिलांशी हितगुज केले. महिला बचत गटांना वीस लाखांपर्यंत विनातारण कर्जाची घोषणा केली. प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. मिरज पंचायत समितीने पूर्व भागात विविध ठिकाणी या संवादासाठी व्यवस्था केली. लॅपटॉप, प्रोजेक्टर व मोबाईल आदी साधने उपलब्ध करुन दिली. बेडगमध्ये महिलांनी तिरंगी साड्या नेसून राष्ट्रगीताचे गायन केले. आरगमध्ये झलकारी ग्रामसंघातर्फे प्राथमिक शाळा, बिरोबा मंदिर, पाटील गल्ली, प्राथमिक आरोग्य केंद्र, अशोकनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राजक्ता, वत्सला, सहेली, शिवतीर्थ, नवजीवन या गटांच्या सदस्य यात सहभागी झाल्या होत्या. ग्रामपंचायतीतही कार्यक्रम झाला. सरपंच सुरेखा नाईक, उपसरपंच विनोद बुरुड, ग्रामसेवक नागेश कोरे यावेळी उपस्थित होते. संयोजन रेश्मा सातपुते, शशिकला गावडे, झलकारीच्या अध्यक्ष अधिका बाबर, मनीषा माने, कांचन जाधव, नंदिता खटावे, अश्विनी पाटील, विजयमाला पाटील, शोभा निकम, स्वप्नाली गायकवाड आदींनी केले.