शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

तिकोंडी खूनप्रकरणी एकास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:51 IST

तिकोंडी खूनप्रकरणी एकास जन्मठेप

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सुरेश विठ्ठल हिंचगिरी (वय ३२, रा. तिकोंडी, ता. जत) यांचा खून केल्याप्रकरणी रामगोंडा शिवगोंडा अमृतट्टी (२८) याला येथील अतिरिक्त सत्रन्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी रामगोंडा याचा भाचा कांतेश आमगोंडा वाडेद (२१) याला २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याबाबत माहिती अशी की, मृत सुरेश हिंचगिरी हा आई-वडील, भाऊ मदगोंडा, त्यांची पत्नी पूजा व बहीण सुजाता यांच्यासह तिकोंडी येथे शेतात राहत होता. आरोपी रामगोंडा याला त्याच्या पत्नीचे सुरेश याच्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण लागली होती. १२ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपी रामगोंडा सुरेशच्या घरी आला होता. दोघेही एकत्रितच घराबाहेर पडले. सुरेश मोटारसायकलीवरून, तर रामगोंडा ट्रॅक्टर घेऊन त्याच्या घरातून गेले. तेव्हापासून सुरेश घरी परत आला नाही. ही बाब सुरेशच्या भावाची पत्नी पूजा हिने मदगोंडा यांना सांगितली. सुरेशचा भाऊ मदगोंडा याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रामगोंडा यांच्या ट्रॅक्टरवरील चालकाकडेही त्यांनी चौकशी केली. त्याने मृत सुरेश व रामगोंडा मोटारसायकलीवरून गेल्याचे सांगितले. सुरेशची मोटारसायकल गावातील कमाल सनदी यांच्या घरासमोर मिळून आली. मदगोंडा यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, सुरेश शौचास जातो असे सांगून ओढ्याच्या दिशेने गेल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी सुरेशचा शोध घेतला, पण तो मिळून आला नाही.भाऊ मदगोंडा यांनी उमदी पोलीस ठाण्यात सुरेश बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. दरम्यान, रामगोंडा याच्या पत्नीशी सुरेशचे अनैतिक संबंध होते. त्यातून दोघांत अनेकवेळा वादही झाले होते. यातून रामगोंडा याने सुरेशचा घातपात केला असावा, असे मदगोंडा यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रामगोंडा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीत रामगोंडा याने अनैतिक संबंधातून सुरेश याचा कुऱ्हाडीने मानेवर, गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली. या खुनात सुरेश याचा मृतदेह पोत्यात घालून नदीत टाकण्यात आला होता. या कामात रामगोंडा याचा भाचा कांतेश वाडेद याने मदत केली होती. त्यालाही पोलिसांनी अटक केली. या दोघांवर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. या खटल्यात १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश रामटेके यांनी रामगोंडा याला जन्मठेप व त्याचा भाचा कांतेश याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यातील सर्व साक्षीदार कन्नडभाषिक होते. त्यांचे जबाब, साक्षी या कन्नडमधून झाल्या. अधिवक्ता आनंद व्यंकटेश देशपांडे यांनी त्याचे भाषांतर करून न्यायदानास सहकार्य केले. तसेच उमदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोहिद्दीन मुजावर, वंदना मिसाळ, रमा डांगे, सुप्रिया भोसले यांनीही खटल्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली. यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्मिता शिंदे यांनी काम पाहिले.