शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शंभर गावांत ‘एक गाव एक गणपती’

By admin | Updated: August 29, 2014 23:13 IST

जोर ओसरला : बक्षीस मिळाल्यानंतर संकल्पनेचा विसर

सचिन लाड -सांगली -पोलीस आणि प्रशासन राबवत असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेचा जोर गतवर्षीपासून ओसरला आहे. यावर्षी जिल्ह्यातील १०० गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या संकल्पनेचा विसर पडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गावातील सार्वजनिक गणेशोत्सवावरील खर्च कमी व्हावा, लोकवर्गणीचा विनियोग समाजहितासाठी व्हावा, गावातील तंटे कमी व्हावेत, मंडळांच्या कार्यकर्त्यांतील स्पर्धा संपावी, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना मांडण्यात आली. या विधायक उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या सध्या वाढत आहे. जिल्ह्यात ७०५ गावे असून, २५ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी असून, पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गावे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहेत. एखादी घटना घडली, तर तिथे पोहोचण्यासाठी पोलिसांना किमान अर्धा तास लागतो. गणेशोत्सवात तर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना घडू शकते. गावपातळीवरील अनेक गावात गट-तट आहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा असते. यातून मग वाद उफाळून संघर्ष व मारामारीचे प्रकार घडतात. यामुळे पोलिसांना चोवीस तास पहारा द्यावा लागतो.बारा वर्षापूर्वी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांनी प्रत्येक गावातील सरपंच व गणेश मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक घेतली. ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेची माहिती सांगून त्यानुसार गावात अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला या संकल्पनेला कमी प्रतिसाद मिळाला. परंतु पोलीस व प्रशासनाने हार मानली नाही. मंडळांच्या कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक आयोजित करुन त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बक्षिसानंतर गावे पडली प्रवाहातून बाहेरसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव स्वच्छ ठेवून राज्यात पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या गावास २५ लाखाचे बक्षीस दिले जाते. हे बक्षीस मिळविण्यासाठी गावा-गावात स्पर्धा असते. त्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेसही काही गुण आहेत. त्यानंतर सात वर्षापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाले. या अभियानात सहभागी झालेल्या गावांनी गावात तंटाच नको म्हणून ‘एक गाव एक गणपती’चा स्वीकार केला. मात्र या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून बक्षीस मिळविल्यानंतर या गावांना संकल्पनेचा विसर पडला आहे.