शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एक पणती त्यांच्यासाठी...

By admin | Updated: November 13, 2015 23:51 IST

देणगीदारांची मदत : सांगलीतील अनाथाश्रमात दिवाळी उत्साहात

सुरेंद्र दुपटे- सांगली -दीपावली म्हणजे उत्साह आणि चैतन्याची उधळण. अंधारलेल्या वाटा सोडून प्रकाशवाटेकडे मार्गक्रमण करण्याचा एक प्रयत्न. दिवाळीमध्ये लख्ख दिव्यांनी उजळून गेलेल्या सांगलीतील वेलणकर अनाथ बालकाश्रमात देणगीदारांनी दिलेल्या वर्गणीतून दिवे, पणत्या, नवीन कपडे, फराळ यांचा आनंद घेत येथील मुलींनी उत्साहात दिवाळी साजरी केली.अनाथ बालकांना देणगीदारांनी दिलेल्या वर्गणीतूनच दिवाळीत नवीन कपडे, फराळ, किल्ल्यावरील साहित्य, दिवे, पणत्या, आकाशकंदील याचा आनंद मिळतो. समाजातील व्यापारी, उद्योजक, देणगीदारांनी वेलणकर बालकाश्रमामध्ये येऊन मुलींना नवीन कपडे, फराळ, खाऊ, फटाके, किल्ल्यावरील साहित्य, आकाशकंदील, रांगोळी दिल्याने मुलींची दिवाळी उत्साहात साजरी झाली. या संस्थेची स्थापना १९४७ ची आहे. ६८ वर्षे ही संस्था अनाथ मुलींचे संगोपन करीत आहे. या मुलींना संगणक प्रशिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेच्या अधीक्षक अनुराधा डुबल यांनी दिली. त्या म्हणाल्या की, सरकारी अनुदान दिले जाते, परंतु ते अल्प प्रमाणात मिळते. समाजातील देणगीदार आपापल्यापरीने मुलींना मदत करीत असतात. वर्गणी, धान्य, कपड्यांची मदत केली जाते. लोकांनी दीपावलीत खूप मदत केली. फराळाऐवजी कच्चा माल दिला, तर तो टिकेल. यंदा फराळ जास्त प्रमाणात आला आहे. देणगीदारांच्या मदतीमुळे मुलींची दिवाळी उत्साहात पार पडली. यावेळी रेश्मा पाटील, भारती कदम, आरती तरवळकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. संस्थेकडून व्यावसायिक प्रशिक्षणया संस्थेची स्थापना १९४७ ची आहे. ६८ वर्षे ही संस्था अनाथ मुलींचे संगोपन करीत आहे. या मुलींना संगणक प्रशिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेच्या अधीक्षक अनुराधा डुबल यांनी दिली. त्या म्हणाल्या की, सरकारी अनुदान दिले जाते, परंतु ते अल्प प्रमाणात मिळते. यामुळे सामाजिक मदतीची गरज संस्थेला भासत असते. संस्थेला विविध सामाजिक स्तरातून मदत मिळत असते. याचा चांगला उपयोगही संस्थेला होत आहे.