शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीसपर्यंत पटासाठी एकच शिक्षक, ६० विद्यार्थ्यांना दोनच शिक्षक : नव्या धोरणात सेवानिवृत्तांना पुन्हा नोकऱ्या

By संतोष भिसे | Updated: March 17, 2024 15:28 IST

नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमधील शिक्षक नियुक्त्यांबाबत शासनाने धोरण जाहीर केले आहे. २० पर्यंत पट असेल, तर एकच कायम शिक्षक आणि जोडीला एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात येणार आहे.

सांगली : नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमधील शिक्षक नियुक्त्यांबाबत शासनाने धोरण जाहीर केले आहे. २० पर्यंत पट असेल, तर एकच कायम शिक्षक आणि जोडीला एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात येणार आहे. या नव्या बदलांमुळे शिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शालेय शिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन शिक्षक संचमान्यता निकष जाहीर केले आहेत. आजवर पहिली ते चौथीच्या शाळांना दोन शिक्षक पदे मंजूर होती. परंतु नव्या धोरणांनुसार वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना एकच नियमित शिक्षकाचे पद मंजूर केले आहे. येथील शिक्षकांना शाळा सांभाळून प्रशासकीय कामेही करावी लागणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमल्याने रोजगाराच्या प्रतीक्षेतील तरुणांवर अन्याय होणार आहे.

 द्विशिक्षकी शाळांमध्ये ६० पटासाठी किमान दोन शिक्षक असतील. तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी आणखी किमान १६ म्हणजे एकूण ७६ विद्यार्थी आवश्यक असतील. पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी असल्यास एकच सेवानिवृत्त शिक्षक नेमला जाणार आहे. सेवानिवृत्त मिळाला नाही, तरट नियमित शिक्षक दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ पटासाठी एक शिक्षक आणि त्यापुढे ५३ पटानंतर नंतर दुसरा शिक्षक मान्य होणार आहे. तिसरा शिक्षक मान्य होण्यासाठी किमान ८८ विद्यार्ती आवश्यक असतील. सहावी ते आठवीच्या दोन वर्गांना ७० पटासाठी दोन व ८८ पटासाठी तीन शिक्षक मिळतील. 

शिक्षक संघटनांनी सांगितले की, नव्या धोरणामुळे मोठ्या संख्येने शिक्षक कमी होणार आहेत. नोकऱ्या कमी झाल्याने सुशिक्षित तरुण बेरोजगार राहणार आहेत.

शाळेसोबतच प्रशासकीय कामकाजही

दुर्गम भागातील व वाड्यावस्त्यांवरील शाळांत तीन-चार वर्गांत मिळून वीसभरच विद्यार्थी असतात. तेथे सर्व वर्गांना मिळून एकच कायम शिक्षक असणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.

 दीर्घकाळ नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण उमेदवारांच्या भविष्याचा विचार शासनाने करणे आवश्यक आहे. नवे धोरण बदलण्यासाठी जुनी पेन्शन संघटनेतर्फे शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.- अमोल शिंदेजिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना