शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आढळला राज्यातील सर्वांत जुना वीरगळ लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:02 IST

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे ९५० वर्षांपूर्वी युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूर योद्ध्याचे स्मारक आढळून आले आहे. महाराष्टÑातील हा ...

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे ९५० वर्षांपूर्वी युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूर योद्ध्याचे स्मारक आढळून आले आहे. महाराष्टÑातील हा सर्वांत जुना वीरगळ लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी याबाबत संशोधन केले आहे.चालुक्यराजा दुसरा सोमेश्वर याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील यो्द्ध्याला वीरमरण आले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर लेख कोरून ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिला लेखयुक्त वीरगळ असून, महाराष्टÑात आढळलेल्या वीरगळ लेखात तो सर्वात जुना असल्याचेही समोर आले आहे. या संशोधनाने जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात भर पडली आहे. प्राचीन काळात एखादा वीर पुरुष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशीळा उभ्या करतात. त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. ते वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकित केलेले असतात. त्यावर खालच्या टप्प्यात संबंधित वीर पुरूषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात हा वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखविलेला असतो.वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योध्द्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत, त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते. महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मिळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. काटकर आणि कुमठेकर अनेक वर्षे वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. अभ्यास करीत असताना त्यांना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापैकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला. हा लेखयुक्त वीरगळ सुमारे पाच फूट उंचीचा आहे. खालील भागात एक वीर ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना दाखविला आहे. वरील कलशाकृती भागावर आणि मधील टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे.प्राचीन इतिहासात मोठी भरवीरगळ अभ्यासासाठी बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), सरपंच व्यंकटराव पाटील, तुकाराम गुरव, सागर शेटे आणि नबीलाल तांबोळी यांचे सहकार्य लाभले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या वीरगळावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच यासंदर्भातील संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहेत. या लेखाच्या संशोधनाने सांगली जिल्'ाच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.काय आहे लेखात...वीरगळावरील लेखात ‘चालुक्यनृपती दुसरा सोमेश्वर ऊर्फ भुवनेकमल्ल’ याच्या कारकिर्दीत आगळगावच्या एका वीराची मोठ्या समूहाशी लढाई झाल्याचे आणि त्यात तो धारातीर्थी पडल्याचे म्हटले आहे. लेख अस्पष्ट असल्यामुळे या वीराचे नाव समजू शकत नाही. गावकुसाच्या तटावरून ही लढाई झाली. चालुक्यनृपती दुसरा सोमेश्वर ऊर्फ भुवनेकमल्ल याची कारकीर्द १०६८ ते १०७६ अशी अवघी आठ वर्षांची होती. त्याचा हा काळ अत्यंत धामधुमीचा होता. वेगवेगळ्या राजवटींबरोबर सातत्याने या काळात युद्धे झाल्याच्या नोंदी आहेत. शिवाय सोमेश्वर याचा धाकटा भाऊ विक्रमादित्य यानेही सोमेश्वराविरोधात बंडखोरी केली होती. तोही सोमेश्वर याच्या ताब्यात असणाऱ्या मुलखांवर स्वाºया करीत असे.