शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाजवळ पेठ हद्दीत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST

इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेठ गावच्या हद्दीतील पाटील मळ्याजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा ...

इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेठ गावच्या हद्दीतील पाटील मळ्याजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. हा अपघात मागील महिन्यात ६ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता घडला. पतीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर मानसिक धक्का बसलेल्या पत्नीने औषधोपचार घेऊन बरे झाल्यानंतर आज पोलिसात फिर्याद दिली.

सरिता सागर उकीरे (वय ३१, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात सागर महादेव उकीरे (३५) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध, अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

सागर उकीरे यांनी जानेवारी महिन्यात कऱ्हाड तालुक्यातील तासवडे येथे हॉटेल चालविण्यासाठी घेतले होते. चार-पाच दिवसांनी ते पट्टणकोडोली येथील घरी येत असत. ६ फेब्रुवारी रोजी दुचाकीवरून (क्र. एमएच ०३ एडी ६९४९) ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पेठ हद्दीतील पाटील मळ्याजवळ त्यांना पाठीमागून आलेल्या वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे सागर उकीरे हे त्यांच्या समोरील वाहनावर जाऊन आदळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हवालदार तुषार देवळेकर अधिक तपास करीत आहेत.