शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

बुध येथे एकावर तलवारीने वार

By admin | Updated: June 14, 2014 01:37 IST

सहा आरोपींना अटक; एक आरोपी फरार

पुसेगाव : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बुध करंजओढा, ता. खटाव येथील रामोशी वस्तीवर दोन गटांत झालेल्या मारामारीत डोक्यात तलवारीने वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांना मार लागला आहे. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्याप एक आरोपी फरार आहे. प्रवीण जाधव असे त्या जखमीचे नाव आहे. वडूज न्यायालयात हजर केले असता आरोपींना दि. १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायसिंग शंकर जाधव (वय ३५) यांनी याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार रायसिंग व त्यांचे चार भाऊ करंजओढा येथील रामोशीवस्तीत एकत्र राहतात. गावातील काही लोकांशी व त्यांचा बरेच दिवसांपासून शेतीवरून वाद सुरू आहे. दि. १२ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रायसिंग यांचा पुतण्या प्रवीण जाधव याची मोटारसायकल अडवून भिवाजी मिठू जाधव, मल्हारी मिठू जाधव, तानाजी मिठू जाधव, संदीप तानाजी जाधव, दिलीप मल्हारी जाधव, संदीप बबन जाधव व महेश मल्हारी जाधव (सर्वजण रा. करंजओढा) यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी रायसिंग व त्यांचे भाऊ तसेच घरातील बायका माणसे भांडणाच्या ठिकाणी जात असतानाच भिवाजी मिठू जाधव याने हातातील तलवारीने प्रवीण याच्या डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र साविंत्रे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)