सांगली : जयसिंगपूजवळ झालेल्या अपघातात आंबेडकरनगर येथील एकजण जखमी झाला. रवींद्र विष्णू कांबळे (वय ५५) असे त्यांचे नाव असून, रविवारी सकाळी अकरा वाजता हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-------------------------
कोरोची येथील एकास विषबाधा
सांगली : कोरोची (ता. हातकणंगले) येथील तरुणास विषबाधा झाला. संजय धोंडिराम पवार असे तरुणाचे नाव असून, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-----------------------------
दुचाकीवरून पडून एक जखमी
सांगली : दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात मिरज येथील एकजण जखमी झाला. गजानन शरद आपोळकर असे त्यांचे नाव असून, अंकली-मिरज रोडवर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-------------------------
नागाव येथे तरुणास सर्पदंश
सांगली : नागाव निमणी (ता. तासगाव) येथील रावजी सुरेशचंद्र मलमे (वय २५) या तरुणास सर्पदंश झाला. शनिवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. नातेवाइकांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.