शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांकडून शंभर टक्के ऊसदर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, क्रांती व अन्य कारखान्यांनी जाहीर केलेले दर आम्हाला मान्य नाहीत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून डॉ. सी. रंगराजन् ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, क्रांती व अन्य कारखान्यांनी जाहीर केलेले दर आम्हाला मान्य नाहीत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून डॉ. सी. रंगराजन् समितीच्या ७0-३0 च्या फॉर्म्युल्याच्या अंमलबजावणीची मागणी केली जात आहे. आम्हाला रंगराजन् समितीपेक्षा गणदेवी कारखान्याच्या शंभर टक्के दराचा फॉर्म्युला अधिक न्यायकारक वाटतो. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी या फॉर्म्युल्याचा स्वीकार केला पाहिजे. गणदेवी कारखान्याचा उतारा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांपेक्षा कमी असूनही, गणदेवी कारखान्याकडून सर्वाधिक दर दिला जातो. गाळपाच्या माध्यमातून मिळालेले सर्व उत्पन्न ते ऊस शेतकºयांना दराच्या रुपाने देतात आणि उपपदार्थ निर्मितीमधून कारखान्याचा सर्व खर्च अदा करतात. त्यामुळे ही पद्धत सर्वत्र स्वीकारण्याची गरज आहे. अग्रीम बिलापेक्षा अंतिम बिलाला महत्त्व आहे.ते म्हणाले की, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यासारखे नेते पहिल्या बिलाचाच गाजावाजा करतात. अंतिम बिलाचे काय होते, त्याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे कारखान्यांशी त्यांचे साटेलोटे आहे. शेट्टी यांनी आजवर जाहीर केलेला दर कारखान्यांनी दिलेला नाही. तरीही ते गप्प बसतात. पहिल्या उचलीच्या आकड्यात शेतकºयांना गुंतवायचे, असे या शेतकरी नेत्यांचे कारखानाधार्जिणे धोरण आहे. जागतिक बाजारातील पेट्रोल, डिझेल दराचा साखर उत्पादनावर परिणाम होतो. सध्या क्रुड आॅईलचे दर कमी असल्यामुळे साखर उत्पादन वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.