शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काळी खण सुशोभिकरणासाठी एक कोटी

By admin | Updated: August 11, 2016 00:53 IST

पर्यटनस्थळ विकसित करणार : जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; लवकरच आराखड्यानुसार कामास सुरुवात

सांगली : महापालिकेच्या काळी खण परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यातील एक कोटीच्या कामांना लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती बुधवारी महापौर हारुण शिकलगार यांनी दिली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सकाळी महापौरांसह काळ्या खणीची पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेतून काळी खण सुशोभिकरणासाठी ७० टक्के निधी देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली. उर्वरित ३० टक्के निधीची तरतूद महापालिकेला करावी लागणार आहे. याबाबत महापौर शिकलगार म्हणाले की, काळी खण सुशोभिकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे, पण या प्रस्तावात त्रुटी असल्याने अद्याप तो मंजूर झालेला नाही. हा प्रस्ताव कधी मंजूर होईल, याची माहिती नाही. तोपर्यंत काळी खण परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या परिसराच्या विकासासाठी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी अडीच कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यापैकी एक कोटीच्या कामांना लवकरच सुरुवात होईल. खणीच्या दक्षिण बाजूकडून कामाला सुरुवात केली जाणार असून, तेथील झाडेझुडपे काढून बाकडी बसविली जाणार आहेत. स्वरुपनगरच्या बाजूला होर्डिंग्ज उभारण्याचा मानस आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून त्यासाठी निधी प्राप्त होईल. लवकरच प्रशासनासमोर हा प्रस्ताव ठेवून कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे शिकलगार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रस्तावात या गोष्टीकेंद्र शासनाकडे सादर होणाऱ्या प्रकल्पातील २० टक्के हिस्सा राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाकडून प्राप्त होणार आहे, तर केंद्राकडून ७० टक्के निधी मिळणार होता. या प्रकल्पात सिल्ट ट्रॅप, कुंपण, वॉटर एरियेटर्स, पादचारी मार्ग, सायन्स सेंटर, चिल्ड्रन पार्क, मत्स्यालय, बोटिंग क्लब, अम्फी थिएटर आदीचा समावेश होता. कोल्हापूरच्या रंकाळाप्रमाणे योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.