शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यात बाप-लेकांकडून एकाचा खून

By admin | Updated: June 5, 2016 00:54 IST

तिघेही फ रार : किरकोळ वादातून घडला प्रकार; आष्टा पोलिसांत फिर्याद दाखल

वाळवा : येथील कुंभार गल्लीच्या पाठीमागे चिवळ्या बजरंग पवार (वय ४०, रा. खुंदलापूर-चांदोली वसाहत, बोरगाव, ता. वाळवा) यांचा शनिवारी दुपारी त्याच वसाहतीमधील तिघा बाप-लेकांनी भोसकून खून केला. चिवळ्या पवार यांची पत्नी शित्ती पवार (३५) यांनी आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे. बोरगाव येथील खुंदलापूर-चांदोली वसाहतीतील चिवळ्या पवार व तेथीलच झांजम्या कुस्तान्या पवार आणि त्यांची मुले कपिल झांजम्या पवार व महिनशहा झांजम्या पवार यांच्यात शनिवारी सकाळी अकरा वाजता किरकोळ कारणातून वाद झाला. त्यांच्यात हाणामारीही झाली. त्यानंतर चिवळ्या पवार पत्नी शित्तीसह वाळवा येथील त्यांचे चुलते गिलाट्या पवार यांच्याकडे आले. सकाळी झालेल्या वादात चिवळ््या पवार किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे वाळव्यातील रुग्णालयात जाण्यासाठी ते निघाले. यावेळी त्यांच्यापाठोपाठ झांजम्या पवार, कपिल पवार व महीनशहा पवार हे तिघे बापलेक गिलाट्या पवार यांच्या घरी आले. यावेळी चिवळ््या व त्यांची पत्नी तेथेच असल्याने त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. पुन्हा हाणामारी सुरू झाली. यावेळी तिघा बाप-लेकांनी चिवळ््या यांना जांबियाने भोसकले. वार वर्मी बसल्याने ते जागीच मृत झाले. याबाबत आष्टा आणि इस्लामपूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी घटनास्थळी जाऊन चिवळ्या यांना वाळवा आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी झांजम्या पवार, कपिल पवार, महीनशहा पवार फरार आहेत. चिवळ्या पवार यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, पत्नी आहे. प्रताप पोमण पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)