अण्णासो जाधव हे गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या मोटारीने (एमएच १० एएन ७०६०) कामावरून घरी निघले होते. त्यावेळी किर्लोस्करवाडी-कुंडल रस्त्यावरील कोरोकोट कंपनीनजीक एका अज्ञाताने हात दाखवून त्यांची गाडी अडविली. जाधव यांनी गाडी थांबविताच इतर चारजणांनी दगडाने, काठीने गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच बेसबॉल स्टिक, लाकडी काठी, पाईपने जाधव यांच्या डोक्यावर, हातावर, पायावर, पाठीवर जबर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये जाधव यांच्या गाडीचे सुमारे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळाहून त्यांना पलूस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत जाधव यांनी कुंडल पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
किर्लोस्करवाडीत एकास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST