मेणी (ता. शिराळा) येथील बाबूराव नारायण पाटील यांचे गुढे-पाचगणी मार्गावर रांजनवाडी येथे निनाई किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. ३० जानेवारी रोजी पाटील यांनी नेहमीप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून मेणी येथील घरी गेले. दुकानात कुणीही राहत नसल्याची माहिती संशयित रोशन तोळसनकर यास हाेती. त्याने दुकानाच्या छतावरील कौले काढून दुकानात प्रवेश करत दुकानातील तीस हजाराची रक्कम लंपास केली. ३१ जानेवारी रोजी बाबूराव पाटील यांनी दुकान उघडले असता दुकानातील तीस हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत बाबूराव पाटील यांनी कोकरुड पोलिसांत तक्रार दिली होती. कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित रोशन यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पाेलिसांनी त्यास अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
मेणीतील चाेरीचा छडा : एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST