शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाचा कालबाह्य पोषण आहार जप्त; जत, कुपवाडमध्ये छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2015 01:45 IST

--‘लोकमत’चा दणका

सांगली : जत आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कालबाह्य पोषण आहार उत्पादन केंद्रांवर गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने छापे टाकले. या छाप्यांत जतमधील साहित्य हलविण्यात आल्याचे दिसून आले; मात्र कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील पसायदान महिला विकास संस्थेच्या केंद्रामध्ये एक लाख ४३ हजार रुपयांची सुमारे पाच हजार ६०० किलो गुळाची पावडर मिळून आली आहे. तिचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यात दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर फौजदारी करण्यात येईल, अशी माहिती ‘अन्न-औषध’चे सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. जत तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना कालबाह्य पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १ जुलैला प्रसिद्ध झाले होते. याचा पुरवठा कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील पसायदान महिला विकास संस्था केंद्राकडून केला जात असल्याचेही स्पष्ट केले होते. या वृत्ताची अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, राहुल खंडागळे, श्रीमती रूपाली खापणे, तानाजी कांबळे, आदींच्या पथकाने गुरुवारी जतमध्ये छापा टाकला. जतमधील संशयित ठिकाणाहून साठा हलविण्यात आला होता, त्यामुळे तेथे काहीही आढळून आले नाही. त्यानंतर दुपारी कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील महिला बचत गटाच्या पसायदान विकास संस्थेच्या केंद्रावर छापा टाकण्यात आला. तेथे पाच हजार ६०० किलो कालबाह्य झालेली गुळाची पावडर आढळून आली. तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य आढळून आले. उत्पादक केंद्राने पोषण आहाराच्या पाकिटावर २ जूनची तारीख घातल्याचेही दिसून आले. पॅकिंगवर जुनी तारीख टाकण्याचे कारण त्यांचे प्रतिनिधी सांगू शकले नाहीत. त्याचबरोबर केंद्राकडे उत्पादनाचा परवानाही सापडला नाही. जप्त करण्यात आलेल्या आहारातील नमुने सायंकाळी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यात दोष आढळल्यास संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त कोळी यांनी दिली.